शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 15:33 IST

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय , सरस्वती सभागृह,येथे कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोंदे , स्वरूपाराणी उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठळक मुद्देकाव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवेकवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशनशिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे केले काव्यगायन

ठाणे : " काळावर ठसा उमटविणारी कविता निर्माण होण्यासाठी  अनुभवांची ' शिदोरी ' महत्वाची आहे.' असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशन आणि संवाद - सृजन प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत  होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे, स्वरूपाराणी उबाळे ,कवी प्रसाद कुळकर्णी, प्रकाशक संतोष राणे ई. मान्यवर उपस्थित होते.

          अशोक बागवे पुढे म्हणाले " , शोकाचे रूपांतर श्लोकात करण्याची प्रतिभा कविंमधे असते. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जो अनुभव आपण घेतो तो योग्य अभिव्यक्तिद्वारे मांडणे म्हणजे कविता होय. कविने अनुभवांच्या वेणेतून गेल्याशिवाय  उत्कृष्ट काव्यनिर्मिती होणार नाही. केवळ नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी कवितेतून लागणारे फलक आणि ते लावणारे नंतर गायब होतात . कारण त्यात सिद्धिपेक्षा प्रसिद्धि महत्वाची असते. खरा कवी प्रसिद्धिच्या मागे लागत नाही . त्याची कविताच त्याला प्रसिद्ध करते." कवी प्रसाद कुळकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ", शिदोरी काव्यसंग्रहातील विविध कविता मुंबईच्या ट्रैफिक मधे सुचल्या आहेत. ट्रैफिक मुळे तासनतास गाडीत अडकल्यानंतर चिड़चिड़ कण्यापेक्षा ' मना शांत हो'  असे शब्द उमटू लागले. त्यामधूनच कवितेच्या निर्मितीचे सूत्र गवसले. ट्रैफिकमुळे चिडूंन न जाता मनातल्या मनात स्फुरलेल्या ओळी पाठ करून घरी आल्यावर लिहून काढू लागलो . त्यामुळेच शिदोरी काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे , स्वरूपाराणी उबाळे , प्रकाशक संतोष राणे यांचीही भाषणे झाली . सचिन पेंडसे, बलका मुखर्जी , प्राजक्ता देशमुख , योगेश कुळकर्णी , प्रसाद कुळकर्णी यांनी शिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे काव्यगायन केले .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई