शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आनंद आश्रमचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा; जोरदार शक्ती प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:04 IST

 शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : एकनाथ शिंदे यांनी पुकारेल्या बंडानंतर त्यांना आता पहिली सत्ता आणलेल्या ठाण्यातून देखील पाठींबा मिळत आहे. शिंदे समर्थक रस्त्यावरुन त्यांना पाठींबा देत आहेत. परंतु आता याच शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या अर्थात आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमचा देखील ताबा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मानणारे समर्थक याबाबत काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. त्यानुसार त्यांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. तसेच शक्तीप्रदर्शनातून देखील त्यांनी ताकद दाखवून दिली. दुसरीकडे आनंद आश्रम जवळ देखील सोमवारी याच शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्यासह महिला पदाधिका:यांना देखील याच आनंद आश्रम जवळ शक्ती प्रदर्शन केले. याच माध्यमातून शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमचा ताबा घेण्यास सुरवात केल्याचे दिसत होते. परंतु हा ताबा घेत असतांना शिवसैनिकांनी अद्यापही त्याला कोणत्याही स्वरुपाचा विरोध केलेला दिसून आलेला नाही.

दरम्यान शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेले आनंद आश्रम या वास्तूला ठाणो शहरातील शिवसेना पक्षाच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे  स्थान आहे. याच आनंद आश्रमातून धर्मवीर आनंद दिघे न्यायनिवाडा करत, ज्या वास्तूतून अनेक महत्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. परंतु त्याची पडझड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षापासून सुरु आहे. आता हे काम जवळ जवळ पूर्ण झालेले आहे. परंतु आता शिवसेनेत दोन गट झाल्याने आता आनंद आश्रम कोणाचा असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु आनंद आश्रम आमचाच म्हणत शिंदे समर्थकांनी या वास्तुचाही आता ताबा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांचे शिवसैनिक याला कसे प्रतिउत्तर देणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतून कुठेही गेलेलो नाही. आनंद आश्रमच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते कसे सुरु आहे, याची केवळ पाहणी करण्यासाठी आम्ही आनंद आश्रमात जमा झालो होतो.(संजय मोरे - माजी महापौर, ठाणे)

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना