शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंनी पालकत्व घेतलेल्या 'त्या' चिमुकलीला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आईवडिलांकडे सोपवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 20:51 IST

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांनी प्रियांशीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.

ठाणे - ठाणे येथे राहत असलेल्या पुजारी कुटुंबातील सर्वजण कोरोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले असतानाच त्यांची अकरा महिन्यांची कन्या प्रियांशी मात्र सुदैवाने कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आई, वडील, आजी, आजोबा अशा सर्वांनाच रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यामुळे त्यांच्या समोर प्रियांशीची काळजी कोण घेणार, अशी चिंता होती. मात्र, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांनी प्रियांशीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शिवसैनिक बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रीना मुदलियार यांनी पुढाकार घेऊन हा संपूर्ण काळ प्रियांशी सोबत राहण्याची तयारी दर्शवली आणि त्यांची सोय टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रियांशीचे आईवडील कोरोनाचा यशस्वी सामना करून पूर्णत: बरे झाले आणि तब्बल २१ दिवसांच्या कालखंडानंतर आज गुरुवारी प्रियांशीला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.उद्या शुक्रवारी प्रियांशीचा वाढदिवस आहे, याचे औचित्य साधून ठाणे शिवसेनेच्या वतीने तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वत: एकनाथ शिंदे आवर्जून या हृद्य सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी प्रियांशीला भावी आयुष्याकरिता आशीर्वाद दिले. याप्रसंगी प्रियांशीच्या आईवडिलांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे