शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

By अजित मांडके | Updated: March 30, 2024 07:59 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

ठाणे : जोपर्यंत ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंतची कल्याणची उमेदवारी जाहीर न करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना’, अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला नसल्याने ठाण्यातील शिवसैनिकांत अस्वस्थता वाढीस लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ठाकरे गटाकडून राजन विचारे यांचे नाव अंतिम होऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिंदे गटाला अद्याप विचारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही. शिवसेनेच्या पहिल्या यादीतून ठाणे, कल्याणचे उमेदवार बाहेर राहिल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले. 

ठाणे आणि पालघर या शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपने दावा केला आहे. भाजपला गमावलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा पाय रोवायचे आहेत. महायुतीच्या पहिल्या निवडणुकीतच ही संधी भाजपला दिसत आहे. ठाणे भाजप सोडण्यास तयार नाही. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार असल्यास पाठिंबा देऊ, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीने घेतल्याने शिंदे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. 

ठाणे हा बालेकिल्ला ठाणे हा बालेकिल्ला सोडण्याची तयारी शिंदे गटाची नाही. भाजपने ताणून धरले तर ठाणे राखून कल्याण सोडायचे हाच पर्याय त्यांच्यापुढे असल्याने श्रीकांत शिंदे यांचीही उमेदवारी लटकली. ठाणे सोडले तर भविष्यात विधानसभा व ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आक्रमक होईल व ठाण्यात शिवसेनेला क्षीण करेल, असे संकट समोर दिसत असल्याचे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाणे पूर्व येथे पाटपूजन करण्यात आले; परंतु यावेळी  शिंदे यांनी याविषयी भाष्य करणे टाळले. 

प्रचार रथ तयारनागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाण्यात वाढविण्यात आला. महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विशेष रथ तयार करण्यात आला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असून महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. या प्रचार रथावर ‘विकासाच्या गतीला... मोदींची गॅरंटी... मत महायुतीला’ ही टॅगलाईन लिहिली आहे.

टॅग्स :thaneठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना