शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

शेलार कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरला अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरला अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी मंजुरी दिली. या कोविड केअर सेंटरला मंजुरी दिली नसल्याने ‘लोकमत’ने वारंवार बातम्या प्रसिद्ध करून हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने या कोविड केअर सेंटरला मंजुरी दिली आहे.

शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी शेलार येथील जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. सर्व सुविधा असलेल्या या सेंटरला ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांच्यासह जि.प.चे आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी स्वतः भेट देऊन या कोविड केअर सेंटरची प्रशंसा केली होती. त्याचबरोबर आवश्यक ती सरकारी परवानगीही ग्रामपंचायतीने घेऊन अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण पडून होते.

कोरोना महामारीच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटरला मान्यता न दिल्याने सरपंच चन्ने यांनी जिल्हा प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचबरोबर या कोविड सेंटरच्या संदर्भात बातम्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली व जिल्हाधिकारी डॉ. नार्वेकर यांनी गुरुवारी सायंकाळी या कोविड केअर सेंटरला परवानगी दिली.

या कोविड सेंटरमुळे शेलारसह पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांना फायदा होणार असल्याने लवकरच या केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सेंटर उभारण्यापासून ते मान्यतेपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांसह ‘लोकमत’चे चन्ने यांनी विशेष आभार मानले आहेत.