शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 15:18 IST

भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणानावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

- नितिन पंडीत 

भिवंडी: तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे . त्यातच खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलांमुळे कोरोना रुग्णानासह नातेवाईकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे . भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी नागरिकांची समस्यां लक्षात घेता ग्राम पंचायती मार्फत ५० खतांचे कोविड सेंटर उभारले आहे. शेलार ग्राम पंचायतीच्या सरपंचांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेलार गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या ग्राम पंचायतीने थेट कोविड सेंटर उभारले असलेली जिल्ह्यातील किमान एकमेव ग्राम पंचायत म्हणून शेलार ग्राम पंचायत सध्या चर्चेत आली आहे. 

भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणानावर मोठा ताण निर्माण झाला आहे . त्यातच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी भिनार व सवाद या दोन ठिकाणीच शासकीय कोविड सेंटर बनविण्यात आले आहे. मात्र या दोन्ही सेंटर मध्ये अजूनही हवी तशी सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेतांना पाहायला मिळतात . मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत . या आर्थिक लुटीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच ग्राम पंचायतींमार्फत कोविड सेंटर उभारण्यासाठी शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी मोठी मेहनत घेतली आहे . गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ५० खतांचे हे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या देखील ग्राम पंचायतीने घेतल्या असून शुक्राची या कोविद सेंटरची पाहणी भिवंडी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. 

दरम्यान ग्राम पंचायतीच्या मार्फत लवकरच हे कोविड सेंटर सुरु होणार आहे मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामामुळे आम्हाला अनेक अडचणी आल्या आजही काही विघ्नसंतुष्ट शासकीय अधिकारी आम्हाला कोविड सेंटर उभारण्यासाठी शासकीय नियमांचे पाढे वाचून अडवणूक करत आहे हे दुर्दैवी असून जिल्हाधिकाऱ्यांसह , जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे असून लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी ग्राम पंचायतीस सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे.    

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBhiwandiभिवंडीthaneठाणे