शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार, आव्हाड यांच्या आदेशावरून भाजपमध्ये, पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट

By सदानंद नाईक | Updated: May 31, 2023 03:06 IST

शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. 

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानंतरच आपण भाजपमध्ये गेलो होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी केला. तसेच शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. 

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे  कलानी कुटुंबाकडे राहिली. मात्र, गेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात कलानी कुटुंबाने भाजप सोबत घरोबा केला. पंचम कलानी यांच्याकडे महापौरपद आले. या काळात पक्षाची जबाबदारी भरत गंगोत्री यांच्याकडे आली होती. गंगोत्री यांनी पक्षाच्या पडत्या काळात चार नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. पक्षाचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून गंगोत्री यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, महापालिका सत्तेसाठी, आमदार व खासदार पदासाठी पप्पू कलानी हे सर्वांनाच हवे आहेत. 

भाजपमध्ये कोंडी झाल्यानेच पुन्हा राष्ट्रवादीतराष्ट्रवादीच्या पदाधिकारी बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी मार्गदर्शन करताना केलेल्या गौप्यस्फोटमुळे पुन्हा शरद पवार यांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले. गेल्या वर्षी अंटेलिया व रिजेन्सी हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत माजी आमदार पप्पू कलानी यांनी आपल्याला तुरुंगाबाहेर भाजपने नव्हे, तर महाविकास आघाडीने काढल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पप्पू हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असल्याचे पुन्हा एकवार उघड झाले. दरम्यान, भाजपमध्ये कोंडी झाल्याने, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचे पंचम यांनी सांगितले. कलानी महलच्या पायऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांची झिजवल्या आहेत. कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने, मुलगा ओमी कलानी, सून पंचम कलानी यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे मन वळवून पुन्हा राष्ट्रवादीत आणले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडulhasnagarउल्हासनगर