शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी अशी केली आपल्या आमदारांची सुटका, गुडगावच्या हॉटेलमध्ये होते नजरकैदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 07:11 IST

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते तथा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या काही आमदारांना देशातील काही भागांत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.

- नारायण जाधवठाणे : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते तथा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या काही आमदारांना देशातील काही भागांत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते. त्यातील नितीन पवार, दौलत दरोडा, अनिल पाटील आणि अण्णा बनसोडे यांना गुडगाव येथील हॉटेल ओबेरायमध्ये प्रचंड बंदोबस्त आणि भाजप कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना मिळताच त्यांनी तत्काळ आपली सूत्रे हलवून काँगे्रस नेते अहमद पटेल यांना फोन करून या आमदारांची सुखरूप सुटका केली. या मोहिमेत मूळचे हरयाणाचे असलेले नवी मुंबईतील काँगे्रस नेते तथा शहराचे माजी उपमहापौर अनिल कौशिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना कौशिक यांनी सांगितले की, पवार यांनी अहमद पटेल यांनी ही बाब सांगितल्यानंतर पटेल यांनी तत्काळ आपल्याशी संपर्क साधला. तेव्हा आपण जयपूर येथे होतो. परंतु, तत्काळ गुडगावला येऊन हॉटेल ओबेरॉय गाठले. तेथे किमान दीडशे पोलीस आणि पाचशेच्या आसपास भाजप कार्यकर्ते होते. मात्र,आपण भूपेंद्र हुड्डा व सुखवीर कटारियांना सांगून आणि स्थानिक हरयानवी भाषेत पोलिसांशी चर्चा करून थेट हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवले होते, तो परिसर गाठला. तेथे हे आमदार हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ओएसडी जवाहर यादव यांच्या ताब्यात होते. मात्र, आपण थेट दौलत दरोडा यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधला. तेव्हा यादव यांना आश्चर्य वाटले. मात्र, आपण जरी हरयाणाचे असलो, तरी महाराष्ट्रात रायगडमध्ये आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने उत्तम मराठी बोलतो, असे सांगितले.तसेच हे आमदार राष्ट्रवादीचे नसून शिवसेनेचे आहेत, असे भासविले. त्यानंतर एकेक करून अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ यांना आपल्याला शरद पवारसाहेबांनी पाठवले आहे, असे सांगून विश्वासात घेऊन त्यांना हॉटेलमध्ये एका सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले. त्याअगोदर नितीन पवार यांनी आपली सुटका केलेली होती. तेथे स्थानिक काँगे्रस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहण, धीरज शर्मा उपस्थित होते. तेथून निघताना पोलिसांनी पुन्हा अडवले. मात्र, स्थानिक हरयानवी भाषेत त्यांना दम भरून सरळ गाड्यांमध्ये बसवून पवारसाहेबांनी सांगितलेल्या ठिकाणी नेले. तेथून टर्मिनल-२ गाठून या आमदारांना मुंबईत सुरक्षित पाठवले, असे कौशिक यांनी सांगितले. अशा पद्धतीने शरद पवार यांनी अहमद पटेलांना फोन करून आणि आपल्या तेथील कार्यकर्त्यांना सांगून या तिन्ही आमदारांची सुखरूप सुटका केली. यात अण्णा बनसोडे मात्र अजूनही संपर्काबाहेर असून त्यांचाही लवकर शोध लागेल, असे ते म्हणाले.गुडगावच्या हॉटेल ओबेरायमध्ये किमान दीडशे पोलीस, पाचशेच्या आसपास भाजप कार्यकर्ते होते. मात्र, कौशिक यांनी भूपेंद्र हुड्डा व सुखवीर कटारियांना सांगून आणि स्थानिक हरयानवी भाषेत पोलिसांशी चर्चा करून थेट हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवले होते, तो परिसर गाठला. 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण