शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 18:17 IST

 निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले.

डोंबिवली -  निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  ग्रंथप्रसारक शरद जोशीसंगणक आणि खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची तसेच मराठी पुस्तकांची पहिलीच आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागत असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी वाचकांपर्यंत थेट पुस्तके पोहोचविण्यासाठी नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुस्तकांची चांगली विक्री होत असून त्यांच्या अनेक आवृत्याही निघत आहेत. वाचकांकडूनही या पुस्तकांना चांगली मागणी आहे. अक्षरधारा, साहित्ययात्रा आणि अन्य काही संस्था पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातूनही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र स्वत ग्रंथविक्रेते किंवा प्रकाशक नसतानाही केवळ मराठी साहित्य आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि दर्जेदार मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने जोशी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार संपूर्ण महाराष्टभर करत आहेत. आज वयाच्या ७३ व्या वर्षीही त्यांचे हे काम उत्साहाने सुरू  होते.ग्रंथप्रसारक शरद जोशी अशी त्यांची ओळख होती.पत्रव्यवहारातून ग्रंथप्रसार आणि प्रचार हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या पदराला खार लावून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे हे ग्रंथप्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आजवर सुमारे पन्नास हजार पत्रे लिहिली आहेत. आपले मित्र, परिचित यांना किंवा कोणाला कुठला पुरस्कार मिळाला की त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवायचे आणि त्यात चांगल्या पुस्तकांची नावे, नुकतेच वाचलेले पुस्तक, त्याचे लेखक-प्रकाशक, पुस्तकाची थोडक्यात ओळख, वृत्तपत्रातून आलेली पुस्तकांची परीक्षणे आदी माहिती पत्रातून कळवायची. विविध साहित्यप्रेमी व्यक्ती, वाचक, पत्रकार, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांनाही पत्र पाठवून हा ग्रंथप्रसार केला आहे.केवळ ठाणे, मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्टातील काही भागांसह कोलकाता, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद येथे पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रातून हा ग्रंथप्रसार सातत्याने सुरू असतो.पत्रलेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रातून मराठी साहित्य, लेखक, प्रकाशक तसेच एकूणच ग्रंथव्यवहाविषयी आलेले माहितीपूर्ण लेख, बातम्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्याही मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींमध्ये वाटणे, चांगली पुस्तके लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसंगी ओळखीच्या मंडळींकडे जाणे, त्यांना पुस्तकांविषयी माहिती देणे, ही पुस्तके त्यांनी विकत घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदी कामेही एकीकडे सुरुच असतात. महाराष्टातून प्रसिद्ध होणारी लहान मासिके, साप्ताहिके यांना ते सातत्याने नवीन मराठी पुस्तके, मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे वृत्त, निवडक पुस्तकांची ओळख करून देणारे स्फूट लेखन पाठवत असतात. अनेकवेळा ग्रंथप्रसाराबाबत पत्रके प्रसिद्ध करून ती विविध संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांना पाठवतात तर मोठ्या समारंभातूनही ही पत्रके वाटतात. एक होता काव्हर्र, डॉ. आल्बर्ट श्वाईट्झर, शापित यक्ष, प्रकाशाची सावली आणि अन्य अनेक पुस्तकांचा त्यांनी धडाडीने प्रचार-प्रसार केला आहे. मराठी पुस्तकांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे पुस्तके खरेदी केली जात नाहीत अशी लोकांकडून केली जाणारी तक्रार त्यांना मान्य नाही. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली हे जर मान्य केले तर त्याचा परिणाम मराठी पुस्तकांच्या किंमतीवरही होणारच.बरे महागाई वाढली म्हणून नाटक, चित्रपट पाहणे, सहलीला जाणे, मॉलमध्ये खरेदी करणे किंवा कपडे, हॉटेलिंग तसेच अन्य गोष्टींवर केला जाणारा आणि वाढता खर्च आपण कमी केला आहे का, त्या बाबत आपण कधी तक्रार करतो का, या गोष्टींवर एकावेळी पाचशे ते हजारो रुपये खर्च होतातच ना, मग मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी थोडे पैसे खिशातून गेले तर काय फरक पडतो, असे ते समोरच्याला सांगतात. घरगुती कार्यक्रम, लग्न, मूंज, वाढदिवस आदी प्रसंगी उत्तम पुस्तके भेट द्यावीत, असा त्यांचा आग्रह असतो आणि हे केवळ नुसते सांगणे नसते तर ते स्वतही वेळोवेळी पुस्तके भेट देत असतात.आयडियल बुक डेपोतर्फे देण्यात येणारा वामन देशपांडे पुरस्कृत संत नामदेव पुरस्कार, सन्मित्रकार स. पां. जोशी स्मृती पुरस्कार, दोंडाईचा येथील साहित्य मंडळ, स्नेहवर्धन प्रकाशन, नवचैतन्य प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, व्यास क्रिएशन्स आदी विविध संस्था व प्रकाशनांकडूनही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ललित लेखक अशोक बेंडखळे यांच्या जगावेगळी माणसं तसेच पत्रकार व लेखक श्रीनिवास गडकरी यांच्या जगावेगळं काहीतरी या पुस्तकात ग्रंथप्रसाराविषयी लेख आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीnewsबातम्या