शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शांतीनगर अखेर फेरीवालामुक्त!

By admin | Updated: May 9, 2016 01:58 IST

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा

मीरा रोड/भार्इंदर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहनचालाकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या कारवाईत सातत्य राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शांतीनगरमधील सेक्टर-१, २ तसेच परिसरातील रस्ते अरु ंद आहेत. तेथे ना-फेरीवाला क्षेत्र असतानाही फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली होती. नागरिकांना तेथे चालणे अवघड झाले होते. फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दुकानदार व रहिवाशांनी केली होती. त्यानुसार, काँग्रेसचे सभापती प्रमोद सामंत, जुबेर इनामदार यांनी २७ दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. परंतु, त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला मिळेल, अशी भीती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणून कारवाई बंद पाडली.दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, स्थानिक शिवसेना नगरसेवक प्रशांत दळवी, भाजपा नगरसेवक डॉ. नयना वसाणी, दीप्ती भट, सीमा शाह, दिनेश जैन, अश्विन कासोदारिया यांनी तर धरणे आंदोलन करत फेरीवाले हटवण्याची मागणी केली. परंतु, भाजपा सत्तेत असूनही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. दळवी यांनी तर नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा दिलेला इशारा फुसका ठरला. पण, आयुक्तांनी मोठ्या फौजफाट्यासह येथील दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामे जेसीबी लावून जमीनदोस्त करत दळवींना चांगलाच धक्का दिला. दुकानांवर कारवाई झाली, पण फेरीवाले मात्र खुलेआम रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने अनेकांनी दळवी, महापौर जैन, आमदार मेहता यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावला. दरम्यान, काँग्रेसने फेरीवाले हटवण्यासाठी बेमदुत उपोषण सुरू केले. आमदार मुझफ्फर हुसेन, सभापती प्रमोद सामंत यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्याचबरोबर आमदार सरनाईक यांनीही फेरीवाले न हटवल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा लेखी इशाराच पालिकेला दिला. भाजपाच्या स्थानिक नगरसेवक दीप्ती भट, अश्विन कसोदारिया, दिनेश जैन यांनीही सरनाईक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याबाबतचे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)