शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शहाडचा धोकादायक पादचारी पूल अखेर पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:54 IST

मध्य रेल्वेचा चार तासांचा मेगाब्लॉक : कल्याण ते टिटवाळा प्रवासात रिक्षाचालकांनी केली प्रवाशांची लूट

कल्याण : कल्याण-कसारा मार्गावरील शहाड स्टेशनवरील अतिधोकादायक झालेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ च्या दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक घेतला. तसेच टिटवाळ्याजवळील नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात अनेक पादचारी पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ते पाडून नवे पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिटवाळा स्थानकात नवा पूल उभारण्यात यावा, अशी रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची मागणी होती. गर्डर टाकण्याचे काम रविवारी पार पडले आहे. आता पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या पुलाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकचा रिक्षाचालकांनी भरपूर फायदा घेतला. केडीएमटीने प्रवाशांसाठी जादा बसची व्यवस्था केली होती. मेगाब्लॉकदरम्यान बसला प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. तर, टिटवाळा ते कल्याण या प्रवासासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून प्रतिप्रवासी १०० रुपये भाडे उकळले. भरउन्हात हा ब्लॉक घेण्यात आल्याने कल्याण ते टिटवाळादरम्यान बस, रिक्षाने इच्छितस्थळी जाताना प्रवाशांची बरीच दमछाक झाली.लोकग्राम पादचारी पूल झाला बंद दररोज सुमारे सव्वा लाख रेल्वे प्रवासी ज्या पुलावरून येजा करत होते, तो लोकग्रामचा पादचारी पूल शनिवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईतील धोकादायक पूल कोसळल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने केलेल्या तांत्रिक सुरक्षा परीक्षणात हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल बंद केला आहे.कल्याण रेल्वेस्थानकातील सात क्रमांकाच्या फलाटावरून पूर्वेला जाण्यासाठी १९९० मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर रेल्वे प्रवासी करत होते. प्रवासी लोकग्राम येथून रिक्षा पकडून जात असत. त्यातच, कल्याण पत्रीपूल पाडल्याने तेथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी याच पुलाचा जास्त प्रमाणात वापर होत होता. लोकग्रामचा पादचारी पूल बंद झाल्याने प्रवाशांना कर्जतच्या दिशेकडील स्कायवॉकवरून सिद्धार्थनगर येथे जाऊन मग लोकग्रामच्या दिशेने जाता येणार आहे किंवा पश्चिमेतून रिक्षाने पत्रीपूलमार्गे लोकग्रामला जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच होणार आहे.या गाड्या होत्या रद्द : कसारा ते कल्याणदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या. तर, पुणे एक्स्प्रेस व्हाया दौंड, मनमाडमार्गे चालवण्यात आली. त्याबरोबर कसाºयाकडे जाणाºया नऊ उपनगरी गाड्या आणि टिटवाळ्याकडे जाणारी एक गाडी रद्द करण्यात आली होती.