शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘शबरी’ योजना रखडलेलीच

By admin | Updated: April 25, 2017 00:04 IST

शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची

ठाणे : शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी घेतलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या कामांच्या आढावा बैठकीत समोर आली. त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनेच्या येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), चौदाव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधी इत्यादी योजनांचा आढावा भुसे यांनी क्रमवार घेतला. शबरी घरकुल योजनेतील शहापूर येथील ३१५ पैकी १२१ घरांसाठी अनुदानाचा पहिला हप्ता देऊनही काम सुरू झाले नसल्याची बाब यावेळी समोर आली. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी प्रत्येकाला घर मिळावे, असे शासनाचे धोरण असताना मंजूर झालेल्या घरांचे काम सुरू होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा परिषदेच्या घरकुल योजनांचा येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्याचे आदेश ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल झाल्याबद्दल तसेच जलयुक्तमध्ये चांगले काम झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. जनसुविधा योजनांचा तालुकानिहाय आढावा घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सादरीकरण केले.राज्यमंत्र्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीचा विनियोग, आमचे गाव, आमचा विकास कार्यक्र म, पेसा ग्रामपंचायती, तीर्थक्षेत्र विकास, सर्वशिक्षा अभियान, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांचा विकास, अपंग कल्याण योजना, महिला बालकल्याण योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जिल्हा परिषद सेसमधून केली जाणारी कामे, बांधकाम विभाग आदींचा विस्तृत आढावा घेतला.खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील महत्त्वाच्या सूचना केल्या.सांसद आदर्श ग्राम योजनेची प्रगती अधिक वेगाने व्हावी, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भीमनवार यांनी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्यम कुपोषित बालकांच्या घरी १५ दिवसांतून एकदा, तर तीव्र कुपोषित बालकांच्या घरी ८ दिवसांतून एकदा डॉक्टरांनी भेट देऊन तपासणी करावी, असे निर्देश दिल्याची माहिती दिली.उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनादेखील राज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसान कथोरे, सुभाष भोईर, पांडुरंग बरोरा, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, प्रकल्प अधिकारी रघुनाथ बामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, प्रवीण भावसार, जिल्हा कृषी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, शिक्षणाधिकारी मीना यादव, समाजकल्याण अधिकारी पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)