शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू, कामगारांचे कामबंद आंदोलन मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 18:03 IST

Ulhasnagar Municipal Corporation News : उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करीत होती.

- सदानंद नाईक  उल्हासनगर : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटनेने मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. अखेर महापौर लिलाबाई अशान यांनी निर्णायक भूमिका वठविल्याने, जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याला आयुक्तांनी मान्यता दिली. सातव्या वेतन आयोगाला मान्यता मिळताच कामगार संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेतले. 

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करीत होती. संघटनेच्या मागणीला आयुक्त डॉ राजा दयानिधी दाद देत नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काळ्या फिती लावून काम सुरू ठेवले. सोमवारी कामगार कृती समितीने आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन, सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार पासून कामबंद आंदोलनाची हाक दिली. असे निवेदन दिले. मंगळवारी सकाळी १० वाजता शेकडो कामगारांनी कामबंद ठेवून महापालिका प्रवेशद्वार जवळ एकत्र आले. कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात, दीपक दाबने आदींनी कामगारांना मार्गदर्शन करून कोरोना काळात मास्क व सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले.

 सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगारांची एकी बघून महापौर लिलाबाई अशान यांनी निर्णायक भूमिका वठविली. महापौरांनी महापौर कार्यालयात कामगार नेते, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त मदन सोंडे, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले. कामगार नेत्यांची आक्रमकता बघून जानेवारी पासून कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आयुक्त दयानिधी यांनी मान्यता दिली. तसेच ११ तारीख उलटूनही पगार झाला नसल्याबाबत कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर लिलाबाई अशान यांच्या आदेश आजच कामगारांचे वेतन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.

 कामगारांना भुर्दंडमहापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कामगारांना बसल्याचा आरोप कामगार नेते दिलीप थोरात यांनी केला. कामगारांचे वेतन १२ दिवस उशिरा झाल्याने, घरासह इतर कर्जाचे हप्ते परत जाऊन भुदंड पडला. महापालिका कामगारांना पडलेला भुदंड भरून देणार का? असा प्रश्न थोरात यांनी आयुक्तांना करून त्यांच्यासह महापालिकेच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे