शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल : वागळे इस्टेट भागातील घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: September 18, 2023 20:28 IST

रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता, तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका १२ वर्षीय मुलीला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला वागळे इस्टेट भागातील झुडपामध्ये नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रोहित मोरे (वय २५, रा. किसननगर, ठाणे) या आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने ठोठावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा न्यायालयाने सुनावल्याची माहिती सरकारी वकील विवेक कडू यांनी सोमवारी दिली.

रोहित याने वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या या पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला पैशाचे आमिष दाखवत १९ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता, तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेले. त्याच भागातील झुडपामध्ये तिचा विनयभंग करीत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. २० नोव्हेंबर २०१७ रोजी अपहरणासह बलात्कार आणि विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याखाली वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिस उपनिरीक्षक एस. डी. गवते आणि आर. एम. गोळे आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली होती.

याच गुन्ह्यातील सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आरोपीला ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा १६ सप्टेंबर २०२३ रोजी सुनावली. सरकारी अभियोक्ता म्हणून विवेक कडू यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अमोद सडेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Molestationविनयभंग