शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला सात वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:17 IST

याच खटल्याची सुनावणी २८ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली.

ठाणे : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दक्ष उर्फ डॅनियल सुज्ञान आव्हाड (२०) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास, तसेच सहा हजार रुपये दंडाची  शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी मंगळवारी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.

नवी मुंबईतील वाशी परिसरात ही १४ वर्षीय मुलगी १९ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास तिचा मित्र दक्ष याच्यासमवेत गार्डनमध्ये फिरायला गेली. त्यानंतर त्याने तिला फूस लावून पळवून नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक  नितीन राठोड यांच्या पथकाने आरोपी दक्षला अटक केली होती.

याच खटल्याची सुनावणी २८ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली. यावेळी नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर करून पीडितेची जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जगताप आणि हवालदार लहाने यांनी काम पाहिले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणे