शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार किलो भेसळयुक्त अन्नसाठा जप्त; १७२ नमुने घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:23 IST

साठ्याची किंमत १३ लाख

ठाणे : सणासुदीच्या दिवसांत भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिम राबवून कोकण विभागात भेसळीच्या संशयावरून खवा-मावा, खाद्यतेल, तूप आणि मिठाई अशा अन्न पदार्थांचे एकूण सात हजार किलो वजनाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत १३ लाखांहून अधिक आहे. तसेच यावेळी, प्रशसानाने एकूण १७२ अन्न पदार्थांचे नुमने घेतल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासनाने दिली. तसेच भेसळ संदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडल्या. तिच्या कामात व्यस्त असतानाही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळात-वेळ काढून सणासुदीच्या दिवसांत खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल व वनस्पती तूप व इतर अन्न पदार्थांचा सर्रास वापर केला जातो.या अन्न पदार्थाच्या दर्जा व सुरक्षिततेविषयी अन्न व औषध प्रशासन जागरूक असल्यामुळे अन्न पदार्थाचा दर्जा व सुरक्षितता कायम राहिल. याबाबत दक्षतेचा उपाय म्हणून कोकण विभाग सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या निर्देशानुसार उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत सर्व स्तरावर विशेष मोहिम राबवण्यात आली.

या मोहिमेंतर्गत खवा-माव्याचे ८, खाद्यतेल,वनस्पती व घी याचे ३४, मिठाईचे ७२ आणि रवा-आटा, मैदा आणि बेसन इतर अन्न पदार्थाचे ५८ असे एकूण १७२ अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून खवा-माव्याचे ३२७ किलो वजनाचा ८० हजार ९०० रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.तसेच, खाद्यतेल,वनस्पती आणि घी याचा ४ हजार ३९५ किलो वजनाचा ४ लाख ६ हजार ५३५ रूपये किंमतीचा साठा, मिठाई १ हजार १३८ किलो वजनाचा २ लाख १८ हजार ७२० रुपये किंमतीचा साठा तर रवा, आटा,मैदा आणि बेसन इतर असा १ हजार ७१ किलो वजनाचा ६ लाख २२ हजार ३९० रुपये किंमतीचा असा एकूण १३ लाख २८ हजार ५४५ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.१५ पथकांची मोहीमया मोहिमेतंर्गत ३० अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची १५ पथके तयार केली होती. तसेच अन्न पदार्थाच्या दर्जा व सुरक्षिततेविषयी अन्न व औषध प्रशासन जागरूक असून अन्न पदार्थाच्या भेसळीबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ किंवा ठाणे एफडीए कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :FDAएफडीए