शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आदिवासींच्या वन जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढा - विवेक पंडित

By सुरेश लोखंडे | Updated: October 20, 2022 20:59 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पंडित यांनी आदिवासी क्षेत्रातील विविध योजना, सोयी सुविधा, आरोग्य यंत्रणा आदींचा आढावा घेतला.

ठाणे: जिह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील वनजमनींचे दावे व जमीन मोजणीचे दावे मोठ्याप्रमाणात प्रलंबित आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून ते तात्काळ निकाली काढावेत, असे राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाला सागितले आहे. तसेच वैद्यकीय सेवेचा तुटवडा असलेल्या या आदिवासी भागात वैद्यकीय तज्ञ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी आजच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पंडित यांनी आदिवासी क्षेत्रातील विविध योजना, सोयी सुविधा, आरोग्य यंत्रणा आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, पशुसंवर्धन उपआयुक्त अधिकारी प्रशांत कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी कैलास पवार, शहापूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. एस. किल्लेदार, उप वनसंरक्षक सचिन रेवाळे आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील आदिवासींचे शिक्षण,वैद्यकीय सुविधा,जातीचे दाखले,बालविवाह, वनजमिनी इत्यादींवर जोरदार चर्चा झाली.जिल्ह्याभरात आदिवासी समाजासाठी असलेल्या योजना कालबाह्य झाल्या आहेत का. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे का? आदींचा आढावा घेऊन अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. यामुळे योजनांमध्ये सुधारणा करुन आदिवासी समाजापर्यंत त्याचा लाभ पोचविता शक्य होणार आहे.गेल्या बऱ्याच काळापासून तरतूद नसलेल्या किंवा नाममात्र तरतूद असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करता येतील का आदींची माहितीचा आग्रहही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केला आहे. आदिवासी कुटुंबियांना आधार कार्ड, जातीचे दाखले मिळावेत, यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करा. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगळ्या योजना आणता येतील का याचा विचार होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :thaneठाणे