शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा!', रामदास कदमांकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 23:55 IST

Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले. 

ठाणे :  हकालपट्टी करण्याचा सपाटा शिवसेना नेतृत्वाकडून सुरू आहे. यावरुन नुकतेच शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल झालेल्या रामदास कदम यांनी  हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, असा टोला लगावत एकप्रकारे शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे. तसेच, बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले. 

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पाहायला मिळाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा गट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील आमदार खासदार तसेच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची देखील हाकालपट्टी याच कारणामुळे करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी भावनिक होऊन शिवसेने साठी एवढे वर्ष कार्य करून केलेली हकालपट्टी चुकीची असल्याचे माध्यमांच्या समोर सांगितले. शिवसेनेकडून केलेला हकालपट्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा रामदास कदम यांना शिवसेना नेते पदाची धुरा सोपवली आहे. त्यातच शुक्रवारी रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी आलेले आहेत.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे यावेळी रामदास कदम यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात असून अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी अशी खोचक टीका करत रामदास कदम यांनी सल्ला दिला. तर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देखील यावेळी रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना