शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:34 IST

‘लोकमत’चा दणका : प्रशासकांसोबत झाली बैठक, स्वतंत्र रुग्णवाहिकाही उपलब्ध होणार

अंबरनाथ : कोरोनाच्या संसर्गापेक्षा उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून यासंदर्भात बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. त्यांनी शहरातील वैद्यकीय सुविधांची पोल-खोल करण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन, या बैठकीचा अहवाल प्रशासक जगजितसिंग गिरासे यांना दिला आहे. या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची तयारी गिरासे यांनी दाखवली आहे.

आठवडाभरात अंबरनाथमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले, परंतु कोरोनाचा अहवाल न आलेले रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले होते. तसेच उपचार न मिळाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावून वैद्यकीय सुविधांबाबत आढावा घेतला. उपचारादरम्यान रुग्णांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याचा तपशील मांडणारा अहवाल तयार करण्यासाठीही बैठक झाली. दुपारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पालिकेचे प्रशासक उपजिल्हाधिकारी गिरासे यांची या मुद्यावर आढावा बैठक पार पडली.या बैठकीत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात वैद्यकीय सेवेसंदर्भात भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. शहरात सेवा पुरवत असताना ज्या त्रुटी निर्माण झाल्या, त्या दूर करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आला.शहरात डेंटल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णालय सुरू झाल्यावर इतर रुग्णांनाही विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी स्थानिक डॉक्टरांना आदेश देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कोरोनाची लक्षणे असलेले मात्र ज्यांचे अहवाल आले नाहीत, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी प्रशासक गिरासे यांनी मान्य केली. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शविली. अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.शहरातील वैद्यकीय सुविधा रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही पदाधिकाºयांना घेऊन शहर हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यांची अंमलबजावणी व्हावी, यासंदर्भात प्रशासक गिरासे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. - अरविंद वाळेकर, शिवसेना शहरप्रमुख

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या