शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा, शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 07:55 IST

तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे: कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पोलीस महासंचालक कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तो मंजूर झाल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीसाठी अंधेरी किंवा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.१९८३ मध्ये पोलीस दलात सामील झालेले शर्मा हे सध्या ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातील खंडणी विरोधी पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी ४ जुलै २०१९ रोजीच पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. मात्र हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव असून निवडणुकीबाबत अजून नक्की ठरले नसल्याचा दावा त्यांनी केला. शर्मा यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेत गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.राजीनामा देण्यासाठीच ते गेल्या काही दिवसांपासून महासंचालक यांच्या कार्यालयात फे-या मारीत होते. परंतु राजीनाम्यावर त्यांनी फेरविचार करावा यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून त्यांचे मन वळविण्याचेही प्रयत्न होत होते. शिवसेनेसह भाजपामधील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. वसई आणि नालासोपारा परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्ध युतीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अंधेरी भागातून आपल्या पीएस फाऊंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे याच मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे जाण्याचीही अटकळ व्यक्त होत आहे. याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता शर्मा हेही राजकारणात आपले भविष्य आजमविणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. लष्कर ए तोएबाच्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा शर्मा यांनी केला होता. गेल्या वर्षभरापूर्वी दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही त्यांनी अटक केली होती.