शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

By admin | Updated: March 25, 2017 01:23 IST

ठाणे परिवहनच्या बसगाड्यांत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत

ठाणे : ठाणे परिवहनच्या बसगाड्यांत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची, दिव्यांगांना मोफत प्रवासाची सवलत देण्याची, परिवहनची वेबसाइट सुरू करण्याची, ‘तेजस्विनी’च्या ५०, इलेक्ट्रीक १०० आणि इथेनॉइलच्या १०० बसची खरेदी करण्याची तरतूद असलेला २६८ कोटी २२ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात ११० कोटींची वाढ आहे. परिवहनला ६५ कोटींची तूट अपेक्षित असली, तरी पालिकेकडून मिळणारे अनुदान गृहीत धरल्याने अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेकडून ‘व्हिजन ठाणे’ अंतर्गत १३६.१३ कोटी आणि २०१७-१८ साठी ७० कोटी मिळून २१२ कोटी ४६ लाखांच्या अनुदानाची मागणी केली आहे. हे १२२.८३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. परिवहन सदस्यांच्या संख्येअभावी गेल्यावर्षी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर होऊ शकला नव्हता. यंदा प्रशासनाने तो वेळेत सादर केला आहे. व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी परिवहन सभापती दशरथ यादव यांना तो सादर केला. (प्रतिनिधी)सवलतींचा भार वाढणार-महापालिका हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी २० टक्के सवलत दिली जात होती. परंतु, ही सूट मासिक पास घेतल्यास उपलब्ध होत होती. त्यामुळे या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येत नव्हता. आता ५० टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित केले आहे. विद्यार्थ्यांनाही ५० टक्के सूट दिली आहे. यातून, परिवहनवर १ कोटी ३२ लाखांचा भार वाढणार आहे. हा भार महापालिकेच्या अनुदानातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. ठाणे परिवहन सेवेची वेबसाइटठाणे परिवहन सेवेने आपली वेबसाइट ३े३४ं३.३ँंल्लीू्र३८.ॅङ्म५.्रल्ल कार्यान्वित केली आहे. या वेबसाइटमुळे ठाणे परिवहन सेवेच्या विविध विभागांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाशांना या वेबसाइटमुळे त्यांच्या तक्रारी व सूचना थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत. ‘तेजस्विनी’ महिला टीसी महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ‘तेजस्विनी’ बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहे. याकरिता, महिला प्रशिक्षित चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यंदा या बससाठी महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे. चेहरा बदलणार परिवहनचा ढिसाळ कारभार सुधारण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: लक्ष केंद्रित केले असून ‘ठामपा व्हिजन’ तयार करण्यात आले आहे.