शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तब्बल तीन तास ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकून; ठाणे रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 13:08 IST

प्रवाशाचा रक्तदाब वाढला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

- पंकज रोडेकरठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील लिफ्ट बंद पडल्याने 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून लिफ्टमध्ये अडकलेल्या आनंद चैले (65) यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास लागले. बंद पडलेल्या लिफ्टमध्ये चैले एकटे होते. जर ही घटना गर्दीच्या वेळेस घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. त्याबरोबर या घटनेने रेल्वे स्थानकात बसवलेल्या लिफ्टबाबत संशय व्यक्त होऊ लागला. कळवा, विटावा येथील रहिवासी आनंद चैले (65) हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात सकाळीच आले होते. ते रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3-4 वरुन फलाट 5 क्रमांकावर येणारी जलद लोकल पकडण्यासाठी लिफ्टने जात होते. गर्दी नसल्याने ते लिफ्टमध्ये एकटेच होते. लिफ्ट सुरु झाल्यावर अचानक लिफ्ट मध्येच बंद पडली. लिफ्ट बंद पडल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी लिफ्ट खाली-वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.यानंतर अर्धा तासाने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांनाही लिफ्ट हलवता आली नाही. अखेर तीन तासांनंतर लिफ्ट थोडी वर आल्यावर चैले यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तीन तास एकटेच लिफ्टमध्ये अडकलेल्या चैले यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकात लिफ्ट बंद पडल्यानमुळे प्रवासी अडकल्याची ही पहिली घटना आहे. लिफ्ट नेमकी कशामुळे बंद पडली, याबद्दल रेल्वे प्रशासनने माहिती दिलेली नाही.  

टॅग्स :thaneठाणे