शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहतुकीच्या श्रेयावरून सेनेत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:13 IST

जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाच्या सोमवारी केलेल्या सादरीकरणातून ठाणे महापालिका आयुक्त संजीव

ठाणे : जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाच्या सोमवारी केलेल्या सादरीकरणातून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकप्रतिनिधींना डावलल्याने शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असताना, अशाप्रकारे त्याचे श्रेय केवळ प्रशासनाने घेणे चुकीचे असल्याचे मत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.महासभेच्या निमित्ताने आयुक्त आणि शिवसेनेत आधीच ठिणगी पडली असताना आता जलवाहतुकीचा श्रेयवाद पेटण्याची चिन्हे आहेत.वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा जयस्वाल यांनी सोमवारी केली. परंतु, आयुक्त ठाण्यात येण्यापूर्वीच या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला असल्याची भूमिका शिवसेननी घेतलीे. असीम गुप्ता आयुक्त असताना सर्वप्रथम या योजनेचे प्रेझेंटेशन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना दाखवले होते. जयस्वाल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर याकरिता जेवढे प्रयत्न केले तेवढेच किंबहुना जास्त प्रयत्न पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, डॉ. शिंदे आणि कपिल पाटील यांनी केले आहेत. त्यामुळे या योजनेत कोणतीही प्रगती होत असेल तर आयुक्तांनी लोकप्रतिनिधींनासुद्धा विश्वासात घेणे अपेक्षित होते, असे सेनेच्या नेत्यांचे मत आहे. आयुक्त प्रसिद्धीलोलूप असल्याचा आरोप त्यांनी केला.