शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला भाजपाचा शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:05 IST

दारावर लाथा मारत, खुर्च्यांची मोडतोड करत आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देत मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी धिंगाणा घातल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी

कल्याण : दारावर लाथा मारत, खुर्च्यांची मोडतोड करत आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देत मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी धिंगाणा घातल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी गुरूवारी आयुक्त वेलरासू यांची भेट गेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि शिवसेनेच्या आक्रमकतेविरोधात सहकार्याची भूमिका घेतली.पालिकेतील गोल्डन गँग हवी ती काम मिळवते, टेंडरमध्ये रिंग करते हे ठावूक असल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी टेंडर माफियांविरोधात कारवाईचे आश्वासनही आयुक्तांकडून पदरात पाडून घेतले.या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. पक्ष म्हणून भाजपाचा आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा वेलरासू यांना पाठिंबा असल्याचे गटनेते वरुण पाटील यांनी स्पष्ट केले. आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत स्मार्ट सिटी निधी, अमृत निधीच्या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा करणे, २७ गावांतील पाणी समस्या, नगरसेवक निधीची कामे व त्यांच्या फायली मंजूर होण्यास लागणारा विलंब, मागील तरतुदींपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची कामे, गणेशोत्सवापूर्वीची कामे, बीएसयूपी योजनेत वाटप झालेल्या घरांमध्ये राहण्यायोग्य सुविधा नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. निविदांमध्ये होणाºया टेंडर- रिंगमाफियांच्या हस्तक्षेपाचा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला.चर्चेअंती आयुक्तांनी १५ ते २० लाखांपर्यंतची नगरसेवक निधीची कामे तत्काळ सुरू करणार असल्याचे सांगितले. २७ गावांतील पाणीपुरवठा व जलनि:सारणाची कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.तरतुदींपेक्षा जादा खर्च झालेल्या कामांचा आढावा घेऊन इतर विकासकामांना गती देणार, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करणार आहोत. महापालिकेत टेंडर रिंगमाफियांचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही वेलरासू यांनी या वेळी सांगितले.शिवसेनेने पदे देताना भाजपाची कोंडी केल्याने, प्रसंगी खळखळ केल्याने दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर तडजोड होऊन ठरलेली पदे दिली गेली होती. पण वेगवेगळ््या प्रकल्पांच्या श्रेयावरून दोन्ही पक्षात सतत कुरघोडी सुरू असते. त्यामुळे आताही नुकतेच पद स्वीकारलेल्या आयुक्तांची शिवसेनेने कोंडी करत त्यांना गेल्या दोन वर्षांतील अपयशाचा जाब विचारल्याने भाजपाने लगोलग आयुक्तांना पूर्ण पाठिंबा देत राजकीय हिशेब चुकता केला.