शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘मुले, नातू-नात यांना मराठी शाळेत पाठवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:31 IST

स.वा. जोशी शाळेचा वर्धापन दिन : मराठी शाळा टिकवण्याकरिता बैठकीत घेतला निर्णय

डोंबिवली : मराठी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशाला गळती लागली असून ती थांबत नाही, ही शोकांतिका आहे. पण, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवणाऱ्या संस्थांवर टीका करण्यापेक्षा मराठी शाळा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे आणि शाळेच्या वास्तूच्या नूतनीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन स. वा. जोशी शाळेत झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केले. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली मुले, नातू-नात यांना मराठी माध्यमाच्या शाळेत आवर्जून प्रवेश घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

स. वा. जोशी शाळेचा ८२ वा वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला. यावेळी उपकार्याध्यक्ष छायाचित्रकार प्रदीप गोसावी, विकास पुराणिक, किरण फडे, रवींद्र तामरस, अशोक साळी, अर्चना कदम, समता पावसकर आदींच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पटांगणावर मेळावा झाला. यावेळी १२०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. ८८ वर्षीय कमलाकर दातार हे ज्येष्ठ माजी विद्यार्थीही उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी शाळेला उभारी मिळावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होणे अत्यावश्यक असून शाळेचे नूतनीकरण आवश्यक आहे, असा सूर यावेळी व्यक्त झाला.

शाळेच्या नूतनीकरणात सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची मुले, नातू, नात यांना आवर्जून मराठी शाळेमध्ये प्रवेश घेणे, त्यांना इंग्रजी माध्यमाप्रमाणे शिक्षण देणे, यासाठी संस्थेच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला सढळ हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

संस्थेच्या डोंबिवली, उरण, ठाणे, भिवंडी, डुंगरेवडघर, कुर्ला आदी ठिकाणी शाळा आहेत. त्या शाळा मराठी माध्यमाच्या असून एकेकाळी तेथे प्रवेशासाठी रांगा लागायच्या. पण, आता मराठी शाळेत प्रवेशासाठी पालकांचा फारसा कल दिसून येत नाही. तो वाढावा, यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे गोसावी यांनी सांगितले.

नूतनीकरणामध्ये असा असावा सहभागवर्गखोल्या, जिने, पॅसेज, प्रसाधनगृहे, कार्यालय, ग्रंथालय, वाचनालय, स्टाफरूम यांचे नूतनीकरण. संपूर्ण इमारतीस अंतर्बाह्य रंगरंगोटी, इमारत डागडुजी, बाहेरून-आतून प्लास्टर, विद्यार्थी दत्तक योजना, संपूर्ण इमारत विद्युतयोजना, वर्गखोल्यांमध्ये स्मार्टबोर्ड, संगणक, पंखे, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावर बेंचेस अशा पद्धतीने वस्तुरूपामध्ये साहाय्य करण्यासह आर्थिक साहाय्य करण्यात यावे, असे आवाहन यावेळीकरण्यात आले.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा