शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेच्या मतपेटीवर डल्ला, भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:39 IST

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे.

ठाणे : हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे. मागील निवडणुकीत मुस्लिम, दलितांची मते भाजपाला मिळाली. मात्र, देशभरात या दोन्ही समाजांवर संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी हल्ले केल्याने ही मते गमवावी लागली, तर समविचारी पक्षाची मते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काबीज करून घसरता आलेख सावरणे, हा भाजपाचा हेतू आहे. त्याकरिता, ठाण्यात भाजपाला शिवसेनेची नितांत गरज आहे.मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपाला अभूतपूर्व यश लाभले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती असल्याने त्या पक्षालाही उत्तम यश लाभले. भाजपाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे व विकासाचे आश्वासन भावल्याने मुस्लिम, दलितांनी मते दिली होती. मात्र, आता तेच यश पुन्हा पदरात पडण्याची सुतराम शक्यता नाही. देशभर गोमांसावरून संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांवर हल्ले केले. दलित तरुणांच्या हत्या, मारहाण अशा घटना घडल्या. ख्रिश्चनांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे मागील वेळी मिळालेली मते यावेळी भाजपा गमावणार आहे. मतांची ही घट भरून काढण्याकरिता भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा २०१९ च्या निवडणुकीत केंद्रस्थानी आणण्याचे निश्चित केले आहे. बुलेट ट्रेनपासून समृद्धी महामार्गापर्यंत भाजपा सरकारच्या अनेक विकास प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची युती अशक्य आहे. साहजिकच, हिंदुत्वाचा मुद्दा, घसरती लोकप्रियता टिकवण्याकरिता आणि शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला चुचकारण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.मुंबई हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बृहन्मुंबईत भाजपाचे १५, तर शिवसेनेचे १४ आमदार विजयी झाले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाले. भाजपा व शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांतील अंतर हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढे होते. दोन्ही पक्षांची युती झाली, तर दोन्ही पक्षांना आपल्या जागा राखणे शक्य होईल. लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी युती झाली, तरच यातील बहुतांश जागा टिकवता येतील, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटते. पालघर पोटनिवडणुकीत परस्परांविरुद्ध उमेदवार देण्यामागे हेच विस्तारवादाचे राजकारण होते.गिळणार नाही तर फोडणार या कात्रीत पक्षपंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेबद्दल काडीचेही प्रेम नाही. मात्र, गरजेपोटी शहा बुधवारी मातोश्रीची पायरी चढले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या काळात युतीमध्ये असलेले भावनिक नाते संपुष्टात आले आहे.आता केवळ व्यावहारिक संबंध उरले आहेत. शिवसेनेच्या बलस्थानांचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करायची व हळूहळू शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याकरिता खच्चीकरण करायचे, हीच भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची कार्यपद्धती आहे, हे शिवसेनेलाही मान्य आहे.मात्र, भाजपासोबत गेले तर ते शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न करणार व गेले नाही तर शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणार, अशा कात्रीत सध्या शिवसेनेचे नेतृत्व सापडले आहे.

टॅग्स :thaneठाणे