शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 04:55 IST

ठाणे-पालघर जिल्हा : समायोजनाचे आदेश

सुरेश लोखंडे 

ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे, असा शासन निर्णय सोमवारी एक आॅक्टोबर रोजी जारी करण्यात आल्यामुळे या २६ सहायकांना दिवाळीपूर्वीच दिवाळीभेट मिळाली आहे. गेली दोन वर्षे ते विनावेतन या पदावर काम करीत होते.

या अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना काढून टाकण्यात येणार होते. त्यांचे वेतनही बंद करण्यात आले होते. पण त्यांची नोकरी टिकावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लढा दिला. शासनदरबारी त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर यश येऊन अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांची नोकरी कायम राहिली. याशिवाय त्यांना रिक्त असलेल्या पूर्णवेळ सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनास घ्यावा लागला.ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील २६ सहायकांचे आता ‘रिक्त’ असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर, आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी जारी केला. शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे दि. १२ फेब्रुवारी २०१५च्या शासन निर्णयानुसार उपरोक्त निर्णय घेणे शक्य झाले.या समायोजनासाठी लागू होणाऱ्या अटी शर्तींनुसार, पूर्णवेळ सहायकाचे त्या शाळेतील पद एकमेव असावे, समायोजन होण्यापूर्वीच्या वेतनाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र संबंधीत अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक यांच्याकडून घेण्यात येईल. पूर्णवेळ समायोजन करताना प्रथम तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या संस्था, शाळांमध्ये समायोजना होणे अपेक्षित आहे. तालुक्यामध्ये पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक पद रिक्त नसल्यास जिल्ह्यामध्ये संबंधीत सहायकाचे समायोजन करण्यात यावे, असेही उपसचिवांनी जारी केलेल्या या शासन आदेशात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन वर्षे केले बिनपगारी कामच्शिक्षक सेनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपासून या अर्धवेळ सहायकांनी बिनपगारी काम केले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. दोन वर्षे बिनपगारी काम करूनही त्यांना नोकरीची शाश्वती नव्हती. नोकरीची टांगती तलवार डोक्यावर कायम असताना, शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रयोगशाळा सहायकांना दिलासा दिला आहे. त्यांना आता या निर्णयामुळे न्याय मिळवून देणे शक्य झाले.

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर