शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी पडली महागात, सर्पदंशाने गेला सर्पमित्राचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:41 IST

पूर्वेकडील संगीतावाडी परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र भरत केणे या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पकडलेल्या विषारी सापाबरोबर सेल्फी काढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे. 

डोंबिवली, दि. 8 - पूर्वेकडील संगीतावाडी परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र भरत केणे या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पकडलेल्या विषारी सापाबरोबर सेल्फी काढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे. भरत शरद केणे (27) असे या तरुणाचे नाव असून तो दत्तनगर परिसरात राहणारा होता. कोणतेही सर्प पकडण्यात पारंगत असलेला हा तरुण गुरुवारी दुपारी फोन आल्यानंतर नांदीवली परिसरात गेला होता. त्याने कोब्रा जातीचा जहाल विषारी नाग पकडला. पकडलेल्या कोब्य्राशी त्याने सेल्फी देखील काढली. मात्र या कोब्रानं चपळाईने भरतच्या पोटाला दंश केला. तरीही त्याने या कोब्य्राला सोबत आणलेल्या बरणीत भरले. मित्राने त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तथापी तेथे लस उपलब्ध नसल्याने भरतला ठाण्याकडे हलविले. प्रवासादरम्यान वाटेत त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही भरतला दोन वेळा सर्पदंश झाला होता, असे नातेवाईक संतोष केणे यांनी सांगितले. सर्पमित्र भरतच्यावर शुक्रवारी दुपारी शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.