शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘आरटीई’ प्रवेशासाठी 542 विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 1:22 AM

२३ नोव्हेंबरपर्यंत मुदत : शिक्षण विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिकांसह पाच तालुक्यांमधील ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये आरटीईखालील २५ टक्के शालेय प्रवेशासाठी प्रतीक्षायादीतील ५४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते केजीच्या वर्गात या बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांचे शालेय प्रवेश दिलेल्या शाळेत जाऊन निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पालकांना केले आहे. यासाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु, पालकांनी या मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहण्याचे मार्गदर्शनही पालकांना करण्यात येत आहे.

प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी शाळेत गर्दी करू नये. प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर नेऊ नये. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी प्रवेश घेताना कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

पुरेशा तयारीने शाळेत जा  nप्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पालकांनी शाळेत घेऊन जावे. nप्रतीक्षायादीमधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर यानंतर दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा