शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

वयाच्या ४४ व्या वर्षी 'मिस्टर वर्ल्ड'साठी निवड; उल्हासनगरच्या बॉडीबिल्डरची जागतिक भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 15:25 IST

बॉडीबिल्डिंगची लहानपणीपासूनच आवड असल्यानं वयाच्या २१ व्या वर्षीपासून म्हणजे आजपासून २३ वर्षांपूर्वी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली.

उल्हासनगर: ध्येय गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर वयाचा अडसर कधीच येत नाही, हे उल्हासनगरच्या एका बॉडीबिल्डरने दाखवून दिलंय. कारण वयाच्या ४४ व्य वर्षी या बॉडीबिल्डरची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झालीये. त्यामुळं त्याच्या तब्बल २३ वर्षांच्या मेहनतीचं चीज झाले आहे.नरेश पंजुमल नागदेव असं या ४४ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव असून ते उल्हासनगरमध्ये वास्तव्याला आहेत. 

बॉडीबिल्डिंगची लहानपणीपासूनच आवड असल्यानं वयाच्या २१ व्या वर्षीपासून म्हणजे आजपासून २३ वर्षांपूर्वी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. सध्या नरेश हे ४० वर्षांवरील वयोगटात बॉडीबिल्डिंग करत असून आत्तापर्यंत त्यांनी मास्टर महाराष्ट्र श्री स्पर्धेत सिल्व्हर मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत सिल्व्हर मेडल आणि वेस्टर्न मिस्टर इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आहे. त्यानंतर नुकताच त्यांनी हिमाचल प्रदेशात झालेल्या मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठीच्या सिलेक्शनमध्ये सहभाग घेतला. या दोन्ही स्पर्धांसाठी त्यांची निवड झालीये. 

सदर निवड झाल्याबद्दल उल्हासनगरच्या त्यांच्या जिममध्ये सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिशय कठोर मेहनतीच्या जोरावर आपण इथवर पोहोचलो असून भविष्यात भारतासाठी मेडल जिंकून उल्हासनगरचं नाव देशात आणि जगात पोहोचवायचं असल्याचं ते म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सोनिया धामी, भरत गंगोत्री यांनीही नरेश यांना शुभेच्छा दिल्या. 

सध्याची युवा पिढी नशेच्या आहारी जात असून त्यांनी नरेश यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं यावेळी त्यांनी सांगितलं. नरेश यांची ज्या स्पर्धांसाठी निवड झाली आहे, त्यापैकी मिस्टर एशिया स्पर्धा ही जुलै महिन्यात मालदीवमध्ये, तर मिस्टर वर्ल्ड स्पर्धा डिसेंबरमध्ये थायलंडमध्ये होणार आहे. नरेश यांचा आजवरचा प्रवास हा सध्याच्या युवापिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावा लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर