शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर ‘मातोश्री’च्या धर्तीवर सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 08:41 IST

सहपोलीस आयुक्तांनी घेतला आढावा, शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या धर्तीवर ठाणे पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. याच सुरक्षाव्यवस्थेचा ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा घेतला. 

शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अजून तरी त्यांनी मुंबईतील वर्षा हे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानांच्या धर्तीवरच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाभोवतीही पोलिसांचे विशेष सुरक्षाकवच उभारले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा असल्यानेही या सुरक्षेची विशेष खबरदारी घेत असल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव आदींनी आढावा घेतला.

अशी राहणार सुरक्षाव्यवस्थापोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली तब्बल १२५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा या निवासस्थानाभोवती दिवसरात्र तैनात राहणार आहे. यात दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्याही  तैनात राहणार आहेत. शिवाय,  सीसीटीव्ही, वॉच टॉवर, मेटल डिटेक्टर, पायलट व्हॅन यांचाही समावेश राहणार आहे.

... तर सुरक्षेचे मॅनेजमेंटहीकेवळ पोलिसांचे मॅनपॉवरच नव्हे तर सुरक्षेची चोख व्यवस्था कशी राहील, यासाठी  त्या भागात येणारे मोर्चे, भेटीसाठी  येणारे कार्यकर्ते  यावर नियंत्रण राहण्यासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते आणि आणि सीसीटीव्हींचा आढावा कराळे यांनी घेतला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. या ठिकाणी आता चोख बंदोबस्त राहणार आहे. मनुष्यबळाबरोबरच तांत्रिक उपकरणांचाही यासाठी विशेष उपयोग केला जाणार आहे.  - डॉ. पंजाब उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना