शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षक महिलेवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:43 IST

प्राची झाडे हिच्यावर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात तिचा मृत्यु झाल्याची घटना अलिकडेच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच खोपट परिसरात सोमवारी सायंकाळी विकास धनवडे या खासगी सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक मंडळाच्या महिला सुरक्षा रक्षकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देखोपट भागातील घटनामहिला गंभीर जखमीआरोपीला नौपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षक मंडळाच्या एका ४२ वर्र्षीय महिलेवर माथेफिरू खासगी सुरक्षारक्षक विकास धनवडे (३६, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याने चाकूने तीन ते चार वार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा येथे राहणारी ही महिला ठाणे महानगरपालिकेच्या खोपट, हंसनगर येथील सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर सोमवारी कर्तव्यावर होती. सायंकाळी तिथे अचानक आलेल्या धनवडे याने तिच्या मानेवर मागील बाजूला चाकूने वार केले. तिने बचावासाठी हात पुढे केल्यानंतर दोन्ही हातांवरही त्याने सपासप वार केले. आरडाओरड करून ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तातडीने विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मानेवर आणि श्वासनलिकेवर गंभीर घाव असल्यामुळे तिला तातडीने मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात हलवल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. हल्ल्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनीच धनवडे याला पकडून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान, ही महिला सुरक्षारक्षक महामंडळात निमसरकारी नोकरीवर असल्याने धनवडे यालाही सुरक्षारक्षक मंडळात नोकरी लावण्याचे तिने आश्वासन दिले होते. त्यापोटी त्याच्याकडून तिने टप्प्याटप्प्याने ५० ते ५५ हजार रुपये घेतले होते. हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा धनवडे याने केला आहे. तरीही, तिचे अन्य एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय त्याला होता. नोकरी आणि ‘त्या’ तरुणाबरोबरच्या संबंधाचा तो सोमवारी सायंकाळी तिच्याकडे जाब विचारण्यासाठी आला होता. गेल्या चार दिवसांपासून तो तिच्याकडे याच कारणासाठी येत होता. पण, ती त्याला पूर्णपणे टाळत होती. यातूनच आलेल्या रागातून तिच्यावर हल्ला केल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिली. सर्व बाबींचा तपास करण्यात येत असून हल्ल्याचे नेमके कारणही पडताळण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.प्राची झाडे पाठोपाठ तिसरी घटना...तीन महिन्यांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणारी प्राची झाडे हिच्यावर तीनहातनाका येथे एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला होता. यात तिचा मृत्यू झाला होता. मुंब्रा येथेही लग्नास नकार देणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने चाकूने हल्ला केला होता. आता हा तिसरा प्रकार असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी