शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आणि मनसेची अळीमिळी गुपचिळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:08 IST

राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत सहभागी असेलही, पण ठाणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर आहे.

ठाणे : खड्ड्यांच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपने आंदोलन करून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, दरवर्षी या मुद्यावर रान पेटवणाºया राष्ट्रवादी आणि मनसेची अद्याप अळीमिळी गुपचिळी का, असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे. राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत सहभागी असेलही, पण ठाणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर आहे. असे असतानाही राष्ट्रवादीने याविरोधात साधा शब्दही उच्चारलेला नाही.शहराच्या विविध भागांत खड्ड्यांनी ठाणेकरांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी मुंब्रा आणि कळव्यात खड्डे नव्हते. यंदा मात्र त्या भागातही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. दरवर्षी या मुद्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक होतात. परंतु, यंदा गणेशोत्सव तोंडावर असतानाही राष्ट्रवादीला शहरातील खड्डे दिसत नाहीत का. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनादेखील शहरातील आणि कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील खड्डे दिसत नाहीत का. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे, हे राष्ट्रवादीचे नगरसेवक, शहराध्यक्ष विसरले का, असा सवाल आता ठाणेकर करू लागले आहेत. अशीच अवस्था मनसेचीहीआहे. कोरोनाच्या काळात विविध विषय घेऊन मनसेने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची झोप उडविली. आता त्यांच्या पदाधिकाºयांना खड्डे दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.