शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुस्तक आदान प्रदान अभिनव उपक्रमाचे दुसरे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 18:11 IST

पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे.

 डोंबिवली - पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांसाठी ३१ मार्च पर्यंत आपल्याकडील पुस्तके लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत नेऊन जमा करायची आहेत. वाचकांनी जास्तीत जास्त पुस्तके जमा करून आपल्या आवडीची इतर पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जावीत असे आवाहन पै लायब्ररीचे पुडंलिक पै यांनी केले आहे.   संपूर्ण जगात जर्मन, फ्र ान्स, इटली व इग्लंड अश्या काही मोजकयाच देशात पुस्तके आदान प्रदान प्रदर्शन चालू असतात. त्यांना त्याठिकाणी उदंड प्रतिसाद ही लाभतो. या उपक्रमांमुळे वेगवेगळ््या विषयांवरील पुस्तकांचा संग्रह जमा होतो. हीच संकल्पना घेऊन डोंबिवलीतही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ९ ते १५ एप्रिल या कालवधीत राबविला जाणार आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनांसाठी वाचकांकडील मराठी व  इंग्रजी भाषेतील, वाचकांनी वाचलेली, सुस्थितीत असलेली, मूळ प्रतच असलेली, वेळेनुसार जमा करायची आहे. यामध्ये कथासंग्रह, कादंबरी, चरित्र, ललितलेख संग्रह व अनुवादित पुस्तके स्विकारली जातील .वाचक त्यांच्या आवडीची कुठल्याही किंमतीची पुस्तके या प्रदर्शनात घेऊ शकतील. ही योजना सर्व डोंबिवलीकरांसाठी आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लायब्ररीचे सभासद असण्याची अट नाही. या उपक्रमामुळे आवडीच्या व न वाचलेल्या पुस्तकांचा संग्रह वाचकांकडे जमा होईल.     ९ ते १५ एप्रिल या कालवधीत साहित्यानंद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत ९ एप्रिलला भारतीय वायुसेवा इतिहास आणि भविष्य यावर एअर मार्शल अरूण गरूड, १० एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता यावर धनश्री लेले, ११ एप्रिल रोजी तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड यावर अतुल कहाते, १२ एप्रिल रोजी बॅकींग- बुडीत कर्जांना जबाबदार कोण यावर उदय कर्वे, दिपक गोंधळेकर वाचकांशी संवाद साधणार आहेत. त्यांची मुलाखत स्नेहल दिक्षीत घेतील. १३ एप्रिल रोजी मायलेकी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यात पूर्वी भावे व वर्षा भावे सहभागी होणार आहेत. मधुरा ओक त्यांच्याशी संवाद साधतील. १४ एप्रिल रोजी एकवचनी या विषयावर संजय राऊत बोलणार आहेत. राजेंद्र हुंजे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. १५ एप्रिलला आरोग्याची गुरूकिल्ली यात डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. महेश ठाकूर, डॉ. सुनिल खासबारदार सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी डॉ. अमृता वेलणकर संवाद साधतील . हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत टिळकनगर शाळेचे पेंढरकर सभागृहात होणार आहे. दररोज सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवली