शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

ई-तिकिटाचा दुसरा प्रयोगही फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:49 IST

बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटाचा प्रयोग आठ वर्षांनंतर ठाणे परिवहनसेवेने प्रायोगिक तत्त्वावर ठाणे ते बोरिवली या एसी मार्गावर सुरू केला असला

ठाणे : बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटाचा प्रयोग आठ वर्षांनंतर ठाणे परिवहनसेवेने प्रायोगिक तत्त्वावर ठाणे ते बोरिवली या एसी मार्गावर सुरू केला असला, तरी यामध्ये अनेक त्रुटी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तिकीट प्रिंटिंग न होणे, ते मशीनमध्ये अडकणे, चुकीचे तिकीट प्रिंट होणे अशा अनेक तक्रारी या यंत्रणेत निर्माण झाल्याने संबंधित एजन्सीवर तत्काळ कारवाईचे आदेश सभापतींनी बुधवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत दिले.ठाणे परिवहनसेवेने २०११ मध्ये ई-तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, यासाठी तीन वेळा निविदासुद्धा काढण्यात आल्या. परंतु, त्यांना प्रतिसादच मिळाला नाही. असे असताना महापालिकेने याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. परंतु, त्यात त्रुटी आढळल्याने परिवहनने हा प्रस्ताव अखेर बासनात गुंडाळला होता. त्यानंतर, मागील काही महिन्यांपूर्वी पुन्हा तो प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, ही सेवा अमलात करताना त्यातील त्रुटी दूर करूनच सुरू करावी, अशी अटही परिवहन समितीने टाकली होती. असे असतानादेखील परिवहनने मागील महिनाभरापासून ई-तिकिटाचा प्रायोगिक वापर ठाणे ते बोरिवली या एसी बसच्या मार्गावर केला आहे. परंतु, या तिकीट प्रणालीत अनेक दोष असल्याचे पत्र परिवहनच्या कामगारांनी १५ दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिले होते. त्यानंतर, अद्यापही कारवाई का झाली नाही, असा सवाल सदस्य राजेंद्र महाडिक यांनी केला. तिकिटावर प्रिंटिंग न होणे, तिकीट मशीनमध्ये अडकणे, चुकीचे तिकीट छापले जाणे यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाददेखील होत असल्याचा मुद्दा प्रकाश पायरे, सचिन शिंदे, राजेश मोरे यांनी मांडला. कामगारांनी पत्र देऊनही संबंधित एजन्सीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रकाश पायरे यांनी केला. त्यामुळे या तिकीट यंत्रणेतील सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करूनच ती सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. अखेर, मावळते सभापती अनिल भोर यांनीदेखील संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.ठाणे : मागील कित्येक महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या खाजगी बसविरोधातील पाढा बुधवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीतदेखील सदस्यांनी मांडला. परंतु, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून काही बस जप्तदेखील केल्या आहेत. मात्र, त्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचा मुद्दा प्रशासनाने विशद केला. त्यामुळे ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील एखादा आरक्षित भूखंड त्या ठेवण्यासाठी द्यावा, असा ठरावच यावेळी समितीने संमत केला. ठाणे महापालिका हद्दीत आजही खाजगी बस बेछूटपणे सुसाट धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून परिवहन समिती सदस्य प्रशासनाकडे मागणी करत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी सदस्याने या बसवर कारवाई झाली नाही, तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही त्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बुधवारी परिवहन समितीची बैठक सुरू होताच, सदस्य सचिन शिंदे यांनी या मुद्याला हात घालून आतापर्यंत किती बसेसवर कारवाई केली, त्या केव्हा बंद होणार, असा मुद्दा उपस्थित केला. इतर सदस्यांनीदेखील तो लावून धरला. दरम्यान, प्रशासनाने या बसवर कारवाईसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर पुरेसे मनुष्यबळ ठेवल्याचे सांगितले. वारंवार कारवाईदेखील सुरू असून दोन बस जप्त केल्याचे सांगितले. परंतु, त्या ठेवण्यासाठीच जागा नसल्याने कारवाई करूनही काही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी एखादा भूखंड मिळाल्यास त्या ठिकाणी या कारवाई केलेल्या बस ठेवता येऊ शकतात, अशी सूचनाही यावेळी प्रशासनाने केली. त्या अनुषंगाने सदस्य सचिन शिंदे यांनी महापालिकेने आपल्या एखाद्या आरक्षणातील एखादा भूखंड यासाठी द्यावा, अशा आशयाचा ठराव मांडला. त्याला राजेंद्र महाडिक आणि राजेश मोरे यांनी अनुमोदन दिले.