लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरी पूर्व येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतांनाच गुरु वारी पुन्हा दुपारी पाचपाखाडी येथे जेसीबीचा धक्का लागून अन्य एक महानगर गॅसची वाहिनी फुटल्याने गॅस गळतीचा प्रकार झाला. यातही सुमारे ६० ते ७० कुटूंबियांना नाहक फटका बसला. सुदैवाने, यात इतर कोणतीही हानी झाली नाही.शहरातील पांचपाखाडी येथील ‘सुंदरम सोसायटी’ जवळ ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ड्रेनेजचे खोदकाम गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जेसीबीद्वारे सुरु होते. याचदरम्यान जेसीबीचा गॅस वाहिनीला धक्का लागल्याने ती फुटून गळती सुरु झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच महानगर गॅसच्या पथकाने धाव घेत तातडीने ही गळती थांबविली. तसेच दुरु स्तीचे कामही हाती घेतले. यावेळी एक फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. दुरु स्तीचे काम झाल्यानंतर दोन तासांनी गॅस पुरवठा सुरळीत झाला. तसेच यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. बुधवारी ही कोपरी पूर्व येथे उड्डाणपूलासाठी खोदकाम सुरू असताना, जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीचे नुकसान झाले होते. यातही सुमारे १५० गॅस ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला.* ज्या ठिकाणी ड्रेनेजसाठी महापालिकेच्या ठेकेदारांकडून अशा प्रकारे काम करण्यात येत आहे, त्यांनी आधी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून अशा प्रकारचे खोदकाम करणे अपेक्षित आहे. ते होत नसल्यामुळे या घटना वारंवार होत असल्याची नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही जेसीबीच्या धक्क्याने गॅस वाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:15 IST
कोपरी पूर्व येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतांनाच गुरु वारी पुन्हा दुपारी पाचपाखाडी येथे जेसीबीचा धक्का लागून अन्य एक महानगर गॅसची वाहिनी फुटल्याने गॅस गळतीचा प्रकार झाला. यातही सुमारे ६० ते ७० कुटूंबियांना नाहक फटका बसला.
ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही जेसीबीच्या धक्क्याने गॅस वाहिनी फुटली
ठळक मुद्देठाणे महापालिका ठेकेदाराचा हलगर्जीपणा सुमारे ७० कुटूंबीय झाले बाधित