शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

यादवविरुद्ध खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल

By admin | Updated: April 1, 2017 23:32 IST

वसईतील एका बिल्डरकडून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात बंदुकीचा धाक

वसई : वसईतील एका बिल्डरकडून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात बंदुकीचा धाक दाखवून ३३ लाख रुपये खंडणी उकळल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात नालासोपाऱ्यातील एका बिल्डरने केली आहे. त्यानंतर पोलिसांनी यादवसह त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी असताना एका डॉक्टरकडून लाच मागितल्याप्रकरणी डॉ. यादवला नोव्हेंबर २०१० ला लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर निलंबित झालेल्या डॉ. यादवने आपल्या भावाच्या नावाने एक नियतकालिक काढून आणि आरटीआयच्या माध्यमातून बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी सुुरु केल्या होत्या. इतकेच नाही तर काही बिल्डरांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल केल्या आहेत. डॉ. यादव यांच्या तक्रारीवरून वसईतील अनेक बिल्डरांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलची हवाही खावी लागलेली आहे. मात्र, तक्रारीच्या आडून बिल्डरांना ब्लॅकमेल केले जात असल्याची चर्चाही वसईत सुरु होती. वसई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या चर्चेला आता उधाण आले आहे.काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम पाडण्याचा इशारा देऊन डॉ. यादवने एका बिल्डरला बंदुकीच्या धाकाने धमकावून २५ लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गेल्या आठवड्यात वसई पोलीस ठाण्यात यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादवने आपला सहकारी अमोल पाटील याच्या मदतीने बिल्डरकडून अडीच लाख रुपये उकळले होते. त्यानंतर दीड लाख रुपयांचा हप्ता घेताना पाटीलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचूबंदर येथे रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर डॉ. यादव फरार झाला आहे.डॉ. यादवने कुणाची फसवणूक केली असेल किंवा धमकावत असेल तर तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले होते. या आवाहनानंतर नालासोपाऱ्यातील बिल्डर वंदेश पुरव यांनी यादवने ३३ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची पहिली तक्रार नोंदवली. नालासोपाऱ्यातील हनुमान नगरातील आपल्या बेकायदा इमारतीबाबत डॉ. यादवने शस्त्राचा धाक दाखवून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.