शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

कळव्यातील सात वर्षीय अपहृत मुलाचा ४८ तासांमध्ये शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ...

ठाणे : कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. या मुलाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुर्ला भागातून ठाणे पोलिसांनी शोधून त्याच्या आईच्या ताब्यात सुपुर्द केले.

कळवा, जयभीमनगर क्रमांक दोन येथील महात्मा फुलेनगर, एमआयडीसी पाइपलाइनजवळ राहणाऱ्या या सात वर्षीय मुलाचे खेळताना कोणी तरी अपहरण केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने कळवा पोलीस ठाण्यात २१ जून रोजी दाखल केली. घरासमोर खेळत असताना २० जून २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी समांतर तपास करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली या अपहरणाचा युनिट एकने तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांनी मुलाच्या अपहरणाची माहिती खबरी आणि पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फोटोसह प्रसारित केली होती. त्याच दरम्यान तो कुर्ला परिसरात असल्याची माहिती काकड यांना एका खबऱ्याकडून व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक काकड, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, जमादार आनंदा भिलारे, हवालदार अजय साबळे, पोलीस नाईक दादा पाटील, भगवान हिवरे आणि पोलीस अंमलदार माधुरी जाधव आदींच्या पथकाची निर्मिती करण्यात आली. कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस ठाण्यात तो होता. या पथकाने नेहरूनगर पोलीस ठाण्यात जाऊन मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन आईच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणी यांनी दिली.

* मुलाकडून मिळाली वेगवेगळी माहिती-

अपहरणानंतर थेट कुर्ला भागात तो कसा पोहोचला, याबाबत या मुलाने वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सुरुवातीला त्याच्याच आईच्या एका मित्राचे त्याने नाव घेतले; परंतु यातील कोणत्याच बाबी सिद्ध न झाल्याने पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिले. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरू असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.