शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

११ हजार विद्यार्थ्यांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:21 IST

इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाइनद्वारे जाहीर होताच प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाइनद्वारे जाहीर होताच प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून बारावीचे १७ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, प्रथम वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या केवळ सहा हजार ०९५ जागाच उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित ११ हजार १३१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.कल्याण-डोंबिवलीत प्रगती, मॉडेल, पेंढरकर, मंजुनाथ, बिर्ला, अग्रवाल, सोनावणे, मुथा ही वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बीएमएस, बीएमएम, आयटी, कॉम्प्युटर सायन्स आदी विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. कनिष्ठ महाविद्यालये जास्त असली तरी येथे पदवीच्या शिक्षणासाठी तितकी महाविद्यालये नाहीत. मोठ्या संख्येने उत्तीर्ण होणारे बारावीचे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमधील मर्यादित जागा, यामुळे प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी १७ हजार विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणे कठीण आहे.प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार, जेथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये एकत्र आहेत, तेथे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयात प्राधानान्ये प्रवेश मिळतो. परंतु, एखादा विद्यार्थी कल्याणच्या कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेला असल्यास त्याला डोंबिवलीतील वरिष्ठ महाविद्यालयात आॅनलाइन प्रक्रियेनुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आसपासच्या ३० महाविद्यालयांचा पर्याय व नावे सूचविण्याची अट होती. यंदाच्या वर्षी १० महाविद्यालयांची नावे सुचवता येणार आहेत.काही विद्यार्थी उल्हासनगरातील चांदीबाई, आर. के. तलरेजा कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुलुंडमधील वझे-केळकर व काही मुंबईतील महाविद्यालयांची नावे सुचवू शकतात. सगळेच विद्यार्थी हे कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांना पसंती देतीलच असे नाही. याशिवाय कर्जत, नेरळ, खोपोली, आसनगाव तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रम व इंजिनिअरींगलाही काही विद्यार्थी पसंती देऊ शकतात. त्यामुळे ११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईलच असे नाही, असे महाविद्यालयांतील सूत्रांनी सांगितले.सोनावणे कॉलेजचे उपप्राचार्य अशोक पडवेकर म्हणाले, कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. ठाणे विभागात तीन-चार वर्षांपासून हे दिसत असून, त्याचे नेमके कारण समजत नाही. यंदा निकाल मागच्या वर्षांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला आहे. कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आणि जागा कमी असल्याने या शाखेत प्रवेशासाठी चुरस जास्त असणार आहे. कला शाखेच्या शिक्षणाचा टक्का घसरला आहे, तर अन्य अभ्यासक्रमांकडे तो वाढतो आहे.मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर म्हणाल्या, यंदाच्या वर्षी निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे अ‍ॅडमिशन फुल्ल होणार आहेत. विद्यार्थ्यांचा कल हा व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे जास्त असतो. महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा मागील वर्षीप्रमाणे असून त्यात कोणताही बदल झाला नाही.पेंढरकर कॉलेज, डोंबिवलीकला- २४०(मराठी), १२० (इंग्रजी), वाणिज्य-४८०, विज्ञान- १२०, बीएससी कॉम्युटर सायन्स- ६०, बीएससी बायोटेक- ३५, बीएससी आयटी- ६०, बीएमएस- १२०, अकाउण्ट अ‍ॅण्ड फायनान्स- १२०, बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स- १२०.बिर्ला कॉलेज, कल्याणवाणिज्य- ६००, बीएससी- २४०, कला- ३६०, बीएससी कॉम्प्युटर सायन्स- ७२, आयटी- १२०, बीएमएस- १८०, मॅनेजमेंट अ‍ॅण्डस्टीडज् - १२० ,अकाउण्ट अ‍ॅण्ड फायनान्स- १२०मुथा कॉलेज कल्याणकला-१२० (मराठीमाध्यम), वाणिज्य- २४०, विज्ञान- १२०, बीएमएस-६०, बॅकिंग इन्शुरन्स-६०,कॉम्युटर सायन्स - ६०, आयटी-६०प्रगती कॉलेज, डोंबिवलीकला-१२०, वाणिज्य-२४०, बीएमएस-६०, बँकिंग आणि इन्शुरन्स-६०, बीएस्सी आयटी-६०सोनावणे कॉलेज, कल्याणकला-२४० (मराठी माध्यम), वाणिज्य-६००, विज्ञान-१२०, बीएमएस-१२०, बीएस्सी आयटी-१२०, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स-४८