शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवकांच्या खिशाला बसणार कात्री, नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख देण्याची पालिकेची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:11 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी आता नगरसेवकांच्या खिशाला कात्री देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक नगरसेवकाच्या नगरसेवक निधीतून पाच लाख घेतले जाणार आहेत.

ठाणे : ठाणे शहरात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. आता त्यासाठी महापालिकेच्या १३१ नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाखांचा निधी मागविला जात आहे. परंतु हा निधी देण्यास भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. नगरसेवकांचा निधी हा तुटपुंजा पडू शकतो, त्यापेक्षा आपला दवाखान्याचा १५० कोटींचा निधी त्यासाठी वापरण्यात यावा असा सुर भाजपच्या नगरसेवकांनी लावला आहे. त्यामुळे हॉस्पीटल उभे राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.                           शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात आता ग्लोबल इन्पॅक्ट हबच्या ठिकाणी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हे रुग्णालय लवकरात लवकर उभारावे अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आता हे रुग्णालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने नगरसेवकांच्या खिखाला कात्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच पाच लाख या कामासाठी देण्यात यावेत अशी सुचना पालिकेने केली आहे. त्या अनुषगांने प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांशी चर्चा करुन हा निधी देण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे भाजपच्या गरसेवकांच्या या चर्चेत अनेक नगरसेवकांनी हा निधी देण्यास विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय उभारण्यास आमचा विरोध नाही, किंवा निधी देण्यासही आमचा विरोध नाही. मात्र नगरसेवक निधीतून केवळ ६ ते ६.५ कोटी जमा होऊ शकतात. उर्वरीत निधीचे काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे या संदर्भात भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन नगरसेवक निधी पेक्षा आपला दवाखान्यासाठी जो १५० कोटींच्या आसपास निधी ठेवण्यात आला आहे, तोच निधी या रुग्णालयासाठी देण्यात यावा अशी सुचना त्यांनी केली आहे. तसेही शहरात आपला दवाखाना काही सुरु झालेले नाहीत. शिवाय जे सुरु आहेत, त्याठिकाणी साहित्य, डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळे हा निधी वाया जाण्यापेक्षा तो या रुग्णालयासाठी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोरोनाचे हे रुग्णालय ठाण्यात उभे राहणार की नाही? याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या