शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पालिका रुग्णालयात अ‍ॅण्टी रेबिजचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:36 IST

सरकारचा औषधे पुरवणा-या कंत्राटदारासोबतचा दरकरार संपला असल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात अ‍ॅण्टी रेबिज लसचा साठा संपुष्टात आला आहे

धीरज परब मीरा रोड : सरकारचा औषधे पुरवणा-या कंत्राटदारासोबतचा दरकरार संपला असल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात अ‍ॅण्टी रेबिज लसचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी, कुत्रा चावल्यास नागरिकांना खाजगी दवाखान्यातून जास्त पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेची भार्इंदर येथे भीमसेन जोशी रुग्णालय, तर मीरा रोड येथे इंदिरा गांधी अशी दोन रुग्णालये आहेत. तर, शहरात सध्या ८ आरोग्य केंद्रे व २ उपकेंदे्र आहेत. सरकारच्या यादीवरील श्री जी इंटरनॅशनल या कंत्राटदाराकडून पालिका अ‍ॅण्टी रेबिज लसची खरेदी १३७ रुपये दराने करते. तीच लस औषधांच्या दुकानांमध्ये ३५० रुपयांना मिळते. तर, दवाखान्यात त्यापेक्षा अधिक शुल्क घेतले जाते.गेल्या वर्षीच जुलैदरम्यान सरकारचा औषध पुरवठादारांसोबतचा दरकरार संपुष्टात आला. सरकारने नवीन पुरवठादारांची नियुक्ती केली नाही, शिवाय जुन्यांना मुदतवाढही दिली नाही, जेणेकरून पुरवठादारांनी औषधे पुरवणे थांबवले आहे. याचा फटका कुत्रा चावणाºया नागरिकांना बसला आहे.शहरातील दोन्ही रुग्णालये व सुमारे १० आरोग्य केंद्रांमध्ये अ‍ॅण्टी रेबिज लसीचा साठाच संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुत्रा चावल्यास पालिका रुग्णालय वा आरोग्य केंद्रात जाणाºया नागरिकांना लस नसल्याचे सांगून परत पाठवले जाते. सुमारे १५ दिवसांपासून रुग्णालय व आरोग्य केंद्रात लसच मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्यात जाऊन अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.पालिकेला दरवर्षी सुमारे १५ हजार लसीची गरज असते. पालिकेने गेल्या वर्षी १० हजार लसपुरवठा करण्याचे कार्यादेश कंत्राटदार श्री जी इंटरनॅशनलला दिले होते. पण, कंत्राटदाराने तीन टप्प्यांत केवळ ६ हजार ३०० लस पुरवल्या. सरकारकडून नवीन दरकरार होत नसल्याने लसपुरवठ्यासह उत्पादनावरही परिणाम झाला आहे. लसचा तुटवडा भासण्याची शक्यता पाहता पालिकेने निविदा मागवल्या होत्या. परंतु, पहिल्या निविदेला आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा काढली. निविदेत कंत्राटदाराने २१७ रुपये प्रति लस असा दर दिला असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेसूत्रांनी सांगितले. सरकारने येत्या १० ते १५ दिवसांत नवीन दरकरार केले नाहीत, तर १३७ रुपयांना मिळणारी लस पालिकेला २१७ रुपये प्रतिलस दराने खरेदी करावी लागणार आहे.