शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 16:42 IST

येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे.

ठळक मुद्देधुरापासून होणार सुटकासहा भागात प्रकल्पाचा आराखडा तयार

ठाणे - ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जवाहरबाग स्मशानभुमीच्या विस्तारीकरण आणि आधुनिकरणाचे काम आता शेवटच्या टप्यात आले आहे. ही स्मशानभुमी २६ जानेवारीला कार्यान्वित होणार होती. अंतिम टप्प्यात आले असून 26 जानेवारीला ही स्मशानभुमी कार्यिन्वत करण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र, काही महत्वाची कामे शिल्लक राहिल्याने हा मुहुर्त आता लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता यासाठी पुढील महिन्याचा मुर्हुत काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.                 ठाणे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आणि शहरातील सर्वात जूनी स्मशानभुमी म्हणून जवाहरबाग स्मशानभुमीची ओळख आहे. स्माशनभूमीच्या दिशेने जाणारे रस्ते अरु ंद आहेत. सतत वर्दळीचा रस्ता असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होते. तसेच स्मशानभुमीची जागाही लहान असल्याने तिथे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. याशिवाय, स्मशानभूमीतील उष्णता, वास आणि धुराच्या प्रदुषणाचा परिसरातील वसाहतींना त्रास होत होता. परंतु हीच नेमकी बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशानाने दोन वर्षांपुर्वी या स्मशानभुमीच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्वसाधारण सभेने सीएसआर फंडातून काम करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सहियारा संस्थेच्या माध्यमातून स्मशानभुमीचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दहा दिवसांपुर्वी पाहाणी दौरा करून स्मशानभुमीशी निगडीत कामे युध्द पातळीवर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. स्मशानभुमीसमोरील रस्त्याचे बांधकाम करणे आणि त्यामध्ये बाधीत होणाºया कुटूंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच २६ जानेवारीला स्मशानभुमी कार्यान्वित करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या. मात्र, अंतिम टप्प्यातील कामे पुर्ण झालेली नसल्याने ही तारीख टळली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात स्मशानभुमी कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली.अग्निशमन इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या सहा भागांमध्ये प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जुन्या स्मशानभुमीच्या जागेच्या चार पट म्हणजेच ३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नवीन स्मशानभुमी उभारण्यात आली आहे. त्यासाठी या भागातील बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील उष्णता, धूर शोषूण घेण्यासाठी चिमणी बसविण्यात आली आहे. त्यामुळे आसपासच्या भागाला यापुर्वी होणारा त्रास टळणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त