शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:55 IST

पत्नीसह तिघांना अटक; आधुनिक तंत्रज्ञानाने उलगडले हत्येचे गूढ

अंबरनाथ : सहा महिन्यांपूर्वीच्या एका खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले. शिरच्छेद केलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली. पत्नी सावित्रीच्या विवाहबाह्य संबंधांतून हे हत्याकांड झाल्याचे धक्कादायक वास्तव या प्रकरणाच्या तपासातून उघड झाले.१० एप्रिल २०१८ रोजी अंबरनाथमधील महेंद्र नगर येथील टेकडीवर मुंडके नसलेला मृतदेह आढळला होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहापासून काही अंतरावर फेकलेले मुंडके शोधून काढले. मृतदेह कुजल्याने त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मृतदेहाच्या हातावर चांद हे नाव गोंदलेले होते. त्या नावावरूनही पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सहा महिने उलटूनही पोलिसांना यश आले नाही.सर्वत्र शोध घेऊनही यश येत नसल्याने साहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी डॉ. हरिष पाठक यांची मदत घेतली. मृत व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सांगाड्यावरून थ्री डायमेंशन तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकावर काल्पनिक चेहरा तयार केला. या चेहºयाचा अंदाज घेऊन पोलिसांनी मृताचे चित्र रेखाटले. त्यानंतर तपासाला खºया अर्थाने गती मिळाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता, त्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या महेंद्रनगर भागातच अशी व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मृताचे सायन कोळीवाडा भागातील मूळ घर शोधून काढले. या भागात चौकशी केल्यानंतर त्याचे नाव बिंद्रेश प्रजापती असून, तो वाहन चालक असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याची पत्नी सावित्री हिला विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सावित्रीचे त्याच भागातील किसनकुमार कनोजीया याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती उघड झाली. खात्री पटल्यावर पोलिसांनी सावित्री आणि किसनकुमार दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांजवळ खुनाची कबुली दिली. प्रेमसंबंधात सावित्रीला पतीचा अडसर नको होता. त्यामुळे त्याला संपविण्याचा कट त्यांनी रचला. त्यासाठी किसनकुमारने त्याचा मित्र राजेश यादव याची मदत घेऊन ब्रिंदेशचा खून केल्याची माहिती आरोपींच्या सखोल चौकशीतून उघडकीस आली.मृताचा केला होता शिरच्छेदआरोपींनी बिंद्रेशला दारू पाजण्याच्या बहाण्याने अंबरनाथ येथील महेंद्रनगर भागात नेले. तिथे दारू पाजून त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून बिंद्रेशचे मुंडके धडावेगळे करून ते ५०० मीटर अंतरावर फेकण्यात आले. अंबरनाथ पोलिसांनी ब्रिंदेशच्या पत्नीसह तिघांना अटक केली असून, त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Murderखूनambernathअंबरनाथ