शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ लॉकडाऊ नविरोधात चळवळ; सोशल मीडियावर आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:48 IST

ठाणेकरांची हाक

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : लॉकडाऊनला विरोध करत ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी ‘हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा’ ही पोस्टर चळवळ सोशल मीडियावर शुक्रवारपासून सुरू केली आहे. लॉकडाऊन वाढवून कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. कोरोनावर लॉकडाऊन हे औषध नाही, त्यामुळे लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी करणारे पोस्टर्स बनवून त्यात आपणच जबाबदारीने वागून थांबलेले आयुष्य पुढे नेऊ या, असा संदेश देण्यात आला आहे.पर्यावरण अभ्यासक व निवेदक मकरंद जोशी, व्यावसायिक सुजय पत्की, कमर्शिअल आर्टिस्ट अतुल जोशी यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

२ जुलैला ठाण्यात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आणि ठाणेकरांचा विरोध तीव्र होऊ लागला. पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये. लॉकडाऊन हा उपाय नाही, हे प्रशासनाला सांगत नागरिकांनी स्वत:हूनच जबाबदारीने वागावे, याबाबत जागृती करणारी ही चळवळ उभी राहिली आहे. लॉकडाऊनविरोधात ठाणेकर सोशल मीडियावर किंवा आपापसांत व्यक्त होत आहेत. लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा लोकांनी जबाबदारीने वागावे म्हणून ही लोकचळवळ सुरू केली असल्याचे मकरंद जोशी यांनी सांगितले.

शासन आणि प्रशासनाने लोकांना नियमांबाबत जाणीव करून दिली पाहिजे. मास्क नाही घातले, सोशल डिस्टन्सिंग नाही पाळले म्हणून संख्या वाढते, हे नागरिकांच्या माथी मारायचे, हे शासनाचे धोरणच चुकीचे आहे. त्यामुळे लोकांना आत्मविश्वास या चळवळीतून देत आहोत, असे त्यांनी सांगितले. अतुल जोशी यांनी हे पोस्टर तयार केले आहे.

यांचा आहे सहभाग

सामान्य नागरिक, सेवा पुरविणारा, रिक्षा-टॅक्सी-चालक, कामगार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कलाकार, कर्मचारी यांना सहभागी करून या पोस्टरवर मी जबाबदारीने वागेन, असा मजकूर लिहिला आहे. यात मी माझ्या कार्यक्षेत्रात पुन्हा कार्यरत होऊन योग्य अंतर आणि नियमित स्वच्छतेने माझ्या संपर्कातल्या सगळ्यांची काळजी घेईन. ‘हॅशटॅग करू या जबाबदारीने पुन्हा सुरुवात’ असे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे