शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गडकरी’च्या आवारात सावरकरांचा स्मृतिस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:05 IST

अंदमानच्या स्मृतींना उजाळा; ठाणे महापालिकेचा पुढाकार

ठाणे : स्वा. वि.दा. सावरकर यांची चिरंतन आठवण राहावी व तरुण पिढीसमोर त्यांचा एक आदर्श राहावा, यासाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.हा स्मृतीस्तंभ गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळील आणि तिकीट खिडकीला लागून असलेल्या कृत्रिम धबधब्याजवळ राहणार आहे. सावरकरांचे ‘ने मजसी ने परत...’ असे सागराला आवाहन करणारे गीत चित्रबद्ध केले आहे. अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतिशील स्वप्न पाहणारे सावरकर, त्या कालावधीतील त्यांची अस्वस्थता आणि त्यातून निर्माण झालेले काव्य हेच जणू दृश्य स्वरूपात स्मृतिस्तंभाद्वारे मांडण्यात येणार आहे. ६० बाय ६० चौरस फूट जागेत सावरकरांचे संकल्पचित्र साकारून वर अंदमानच्या कालकोठडीचे चित्र व पुढे पाण्यात निखळून पडलेली खिडकीची चौकट, त्यापुढे कोलमडून पडलेला ब्रिटिश सत्तेचा पिंजरा व त्यातून बाहेर पडणारे स्वातंत्र्यप्रेमी पक्षी म्हणजे स्वांतत्र्यासाठी तळमळणारे भारतीय, अशा प्रकारची कल्पना साकारण्यात येणार आहे. या स्मृतिस्तंभाची संकल्पना ठामपा सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी मांडली असून त्याची निर्मिती जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील सुनील चौधरी करत आहेत.स्वा. सावरकर हे थोर नाटककारही होते. त्यामुळे गडकरी रंगायतनच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्मृतिस्तंभाला विशेष महत्त्व आहे. हा स्मृतिस्तंभ ठाण्यातील जनतेसाठी अखंड प्रेरणास्रोत ठरणार असून महिनाभरात त्याचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती म्हस्के यांनी दिली आहे.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर