शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सतीश मांगलेला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:26 IST

खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेसह तिन्ही आरोपींची रवानगी  रविवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सनदी अधिकारी राधेश्याम  मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक  करण्यात आली होती.

ठळक मुद्देपुन्हा पोलीस कोठडी मागणार मोपलवार यांच्याकडून खंडणी मागण्याचे  प्रकरण 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेसह तिन्ही आरोपींची रवानगी  रविवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सनदी अधिकारी राधेश्याम  मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक  करण्यात आली होती.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मो पलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी, १  कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची  दुसरी पत्नी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने २  नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन वेळा  पोलीस कोठडी सुनावली. रविवारी दुसर्‍या पोलीस कोठडीची मुदत संपली.  खंडणीविरोधी पथकाने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता,  त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दरम्यानच्या काळात सतीश मांगले याच्याविरोधात नवी मुंबई येथील आणखी  एक तक्रार आली होती. खांदेश्‍वर येथील समीर जाधव याचे एका  तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या तरुणीला कुटुंबीयांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर,  तिचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी समीरने सतीश मांगलेची मदत घे तली होती. रबाळे येथे एका खासगी कंपनीत मोठय़ा पदावर काम करणार्‍या  समीरने त्यासाठी मांगलेला ४ लाख रुपये दिले होते. मांगलेने समीरचे काम  केले नाही, उलट बदनामीच्या धमक्या देऊन समीरकडून खंडणी  उकळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या समीरने विषारी द्रव्य प्राशन  करून आत्महत्या केली होती. हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे असून, मांगलेच्या  अटकेची बातमी समजल्यानंतर समीरचे वडील खंडणीविरोधी पथकाकडे  आले. मात्र, घटनास्थळ नवी मुंबईच्या हद्दीत असल्याने, खंडणीविरोधी प थक त्यांना मदत करू शकले नाही. खंडणीच्या प्रकरणाचा तपास संपलेला नाही. मांगलेच्या लॅपटॉपमध्ये ४000  कॉल रेकॉर्ड्स पोलिसांना मिळालेत. या रेकॉर्ड्सची तपासणी सुरू असून,  आणखी काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांना मिळालेत. त्या आधारे आरो पींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली जाईल, असे खंडणीविरोधी प थकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.

एकाची चौकशी बाकीया प्रकरणात सतीश मांगले याचा सहकारी अनिल वेदमेहता याची चौकशी  पोलिसांनी अद्याप केली नाही. वेदमेहता जुहू येथे राहणारा असून, खंडणी  प्रकरणात त्याचाही सहभाग समोर आला आहे. तक्रारीत आणखी एकाचे  नाव असून, तो साक्षीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक