शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सतीश चाफेकर यांचा पुन्हा लिम्का बुक रेकॉर्डचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 02:40 IST

सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर यांच्या रेकॉर्डची पुन्हा एकदा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सलग चौथ्यांदा त्यांचे रेकॉर्ड लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर यांच्या रेकॉर्डची पुन्हा एकदा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सलग चौथ्यांदा त्यांचे रेकॉर्ड लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे. यावेळी प्रणव धनावडे याच्या ३३ बॅटवर ३२३ स्वाक्षऱ्या घेतल्याबद्दल त्यांचे रेकॉर्ड नोंदवले आहे. प्रणवने ३२३ चेंडूंत नाबाद १००९ धावा केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी या स्वाक्षºया घेतल्या होत्या.चाफेकर यांच्या नावावर लागोपाठ तीन वर्षे तीन लिम्का रेकॉर्ड असून नुकतेच चौथे रेकॉर्डही केले आहे. त्यांनी डोंबिवलीला अनोखे स्वाक्षरी संग्रहालय बनवले असून तिथे अनेक मान्यवर आपली स्वाक्षरी करून गेले आहेत. त्यामध्ये डॉ. माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत गोवारीकर, बाबासाहेब पुरंदरे, निदा फाजली, कवी ग्रेस, महेश काळे, शौनक अभिषेकी, डॉ. प्रकाश आमटे, अतुल परचुरे, रत्नाकर मतकरी, मधू मंगेश कर्णिक, प्रवीण दवणे, मंदाकिनी आमटे, वासुदेव कामत असे १६० जण स्वाक्षरी करून गेले. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी त्यांचे खूप मोठे चित्र चाफेकर यांच्या स्वाक्षरीच्या भिंतीवर केले आहे. हे घर भारतातील पहिलेच घर असल्याने त्याचे ‘लिम्का रेकॉर्ड’ झाले. त्यांचे दुसरे लिम्का रेकॉर्ड म्हणजे, राहुल द्रविड याच्या कारकिर्दीत त्याने ४८ शतके केली, म्हणून त्याच्या ४८ स्वाक्षºया आहेत. तिसरे रेकॉर्ड सचिन तेंडुलकर याच्या स्वाक्षºयांचे आहे. त्याची पहिली स्वाक्षरी १९९० मध्ये घेतली होती. त्याच्या एकूण १०० स्वाक्षºया चाफेकर यांच्या संग्रही असून त्या त्याने १०० शतके केल्याबद्दल आहे, तर चौथे लिम्का रेकॉर्ड प्रणव याच्याबद्दल झाले आहे. आपल्या स्वाक्षरीसंग्रहाची ते विविध ठिकाणी प्रदर्शनेही भरवतात. रेकॉर्ड हे रेकॉर्डच असते. प्रणवच्या रेकॉर्डचे मी रेकॉर्ड केले, असे चाफेकर यांनी लोकमतला सांगितले. वयाच्या अकराव्या वर्षी मान्यवर लेखक, कलाकार, वैज्ञानिक अशा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षºया घेण्याचा छंद त्यांना जडला. तो आजतागायत म्हणजे जवळजवळ ५० वर्षे चालू आहे. त्यांच्याकडे जवळपास १० हजार मान्यवरांच्या स्वाक्षºया आहेत. सध्या त्यांचे लोकमतमध्ये ‘क्रिकेटरेषा’ हे सदर सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणे