शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आठ मालिकांच्या चित्रीकरणावर आली संक्रांत; ठाण्यात सुरू होते शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 04:47 IST

बंदिस्त ठिकाणी काम करू देण्याची निर्माते, दिग्दर्शकांची मागणी

प्रज्ञा म्हात्रेठाणे : लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या मालिकांचे चित्रीकरण अनलॉकमुळे ठाण्यात पुन्हा सुरू झाले होते. परंतु उद्यापासून पुढील दहा दिवस करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार चिंतेत आहेत. मालिकांचे इनडोअर शूटिंग होणार असून सर्वांची व्यवस्था सेटवर करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

ठाण्यात सध्या आठ मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिनेमा, मालिकांचे चित्रीकरण बंद झाले होते. गेले तीन महिने काम नसल्याने हातावर पोट असलेल्या कामगारवर्गाचे प्रचंड हाल झाले. टेलिव्हीजनवर प्रेक्षकांना जुन्या मालिका, मालिकांचे जुने भाग, जुने सिनेमे दाखवले जात होते. प्रेक्षकांनाही तेच तेच पाहून कंटाळा आला आहे. मध्येच बंद पडलेल्या डेलीसोपचे पुढील भाग दाखविण्यात यावे अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचे निर्माते/दिग्दर्शकांनी सांगितले. ठाणे शहरात गेल्या चार दिवसांपासून मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. परंतु गुरुवारपासून पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे निर्माते/दिग्दर्शक/कलाकार त्याचप्रमाणे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जे कलाकार बाहेरून आले आहेत, ते १४ दिवस क्वारंटाइन झाल्यावर सेटवर आले आहेत. मालिकांचे चित्रीकरण सुरू असताना किचनपासून सगळी व्यवस्था ही सेटवर करण्यात येते.कोणीही बाहेर जात नाहीत, कोणाच्या संपर्कात येत नाहीत. सेटवर कोरोनासंदर्भात पुरेशी काळजी घेतली जात असतानाही मालिकांचे चित्रीकरण बंद का करावे, असा सवाल निर्माते/ दिग्दर्शकांनी केला आहे.१३ जुलैपासून मालिकांचे नवीन भाग दाखविण्यात येणार होते. कलाकारांऐवजी कामगारांची संख्या कमी केली आणि सरकारच्या सूचनेनुसार ३३ टक्के कामगार वर्गच सेट वर आहे. सकाळी ७ ते सायं. ७ यावेळेत मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. त्या दरम्यान कोणीही बाहेर जात नाही. तसेच, मालिका सुरू झाल्या की प्रेक्षक टीव्ही समोर बसतील ते बाहेर पडणार नाहीत. लॉकडाऊनला हे फायदेशीर ठरणार आहे. - नितीन वैद्य, निर्माते‘विठोबा रॉक्स’ या संगीत अल्बमचे चित्रीकरण उपवनला होणार होते. ते लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे रद्द केले. मालिकांचे चित्रीकरण सेटवरच होते. दीड वर्षे कोरोनावर लस येणार नाही. म्हणून तोपर्यंत चित्रीकरण थांबविणार का? सर्व नियम पाळून मालिकांचे चित्रीकरण करणाऱ्यांना परवानगी द्या. - विजू माने, दिग्दर्शकपुणे, बीड यांसारख्या ठिकाणाहून येणारे कलाकार क्वारंटाइन होऊन मग सेटवर आले आहेत. त्यामुळे पुरेशी दक्षता चित्रीकरणादरम्यान घेतली जात आहे. तसेच सेटवर काम करणाºया कामगारांना इतक्या दिवसांनी काम मिळाले आहे. आधीच बराच आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी. - रवी करमरकर, दिग्दर्शकआमच्या दोन्ही मालिकांचे शूटिंग हे बंगल्यातच होत आहे. आम्ही कोणाच्याही संपर्कात येणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ हे सेटवरच रहात आहेत. मालिकांचे चित्रीकरण बंद झाले तर टेलिकास्ट पुढे ढकलावे लागेल. - हेमंत सोनावणे, कार्यकारी निर्मातेठाण्यात ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेचे गेली तीन वर्षे कोलशेत येथील सोसायटीमध्ये चित्रीकरण सुरु होते. परंतु कोरोनामुळे या मालिकेचे चित्रीकरण नाशिकला एका रिसॉर्टमध्ये केले जात आहे. सोसायटीतील लोकांना त्रास नको म्हणून जागा बदलली असल्याचे या मालिकेचे कार्यकारी निर्माते हेमंत सोनावणे यांनी सांगितले.

टॅग्स :Shootingगोळीबार