शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

संजीव जयस्वाल जानेवारी २०२० पर्यंत ठाण्यातच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:35 IST

अतिरिक्त मुख्य सचिवांचे आदेश; बदलीच्या चर्चेला पूर्णविराम

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसाठी न्यायालयात काहींनी याचिका दाखल केली आहे. परंतु, दुसरीकडे शासनाने मात्र त्यांना १२ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे मंगळवारी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठीचे मनसुबे रचणाऱ्या विरोधकांना हा मोठा धक्का मानला जात आहे.ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची १२ जानेवारी २०१८ रोजी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नव्या आदेशानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षांकरिता त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ती देतानाच राज्य सरकारला आवश्यक वाटल्यास त्यांची बदली ठरवण्यात आलेल्या दिवसापूर्वी करण्यात येणार असल्याचेही कुंटे यांनी या आदेशात नमूद केले आहे.मात्र, त्याचवेळी एका सनदी अधिकाºयाला एकाच महापालिकेत तब्बल पाच वर्षे काम करण्याची संधी देण्यात आल्याने ठाण्यातच नाही, तर राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. गुजरात राज्यात प्लेगची साथ आली होती, त्यावेळी तत्कालीन राव नावाचे सनदी अधिकारी होते. त्यांना पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारकडून अशी संधी सनदी अधिकाºयांना दिली जाते. ठाणे शहरात सध्या क्लस्टर, मेट्रो आदी महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी जयस्वाल यांना वाढीव कालावधी दिल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात शहरातील डीपी रस्ते पूर्ण करण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. ८० टक्कयांपेक्षा जास्त रस्त्यांचे यामध्ये रुंदीकरण केले आहे. ठाण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांना तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल येण्याआधीच हा निर्णय आला आहे.बदलीबाबत उलटसुलट चर्चाआता राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात आयुक्तांना जास्त कालावधी दिला असल्याने बदलीचा विषय थांबतो की, ऐन लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो पेटतो, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मात्र, शासनाच्या मंगळवारच्या आदेशामुळे आयुक्तांच्या बदलीस तूर्त तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आणखी वर्षभर जयस्वाल ठाण्यातच कार्यरत असतील.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त