शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:39 IST

 स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेतडोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिलालोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रसन्नने मिळविलेल्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही ...

ठळक मुद्देविधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहेया परिक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. तो संवाद ४५ मिनिटांत १ हजार शब्द टाईप करायचे होते.प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळविले आहेत.

 

स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेतडोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर देशात पहिलालोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रसन्नने मिळविलेल्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही परिक्षा दिली होती. संपूर्ण भारतातून विद्यार्थी या परिक्षेसाठी आले होते. ही परिक्षा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी होती. या परिक्षेला ३७ विद्यार्थी बसले होते. या परिक्षेत प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळविले आहेत. या परिक्षेसंदर्भात १० जानेवारीला प्रसन्नला समजले. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा केला नसल्याने परिक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. स्वीय सहाय्यक पदांच्या परिक्षेसाठी १०० शब्द प्रतिमिनिट लघुलेखन येणारा विद्यार्थी असणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसन्न ६०, ८०, १०० आणि १२० शब्द प्रतिमिनिटांच्या परिक्षा दिल्या होत्या. या परिक्षा पास होण्यासाठी साधारणपणे २ वर्षाचा कालवधी लागत असल्याचे प्रसन्न सांगतो.या परिक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. तो संवाद ४५ मिनिटांत १ हजार शब्द टाईप करायचे होते. या परिक्षेतून तीन जणांची निवड करण्यात आली आहे. पण प्रसन्न सर्वप्रथम आल्यामुळे नोकरीची पहिली संधी त्याला मिळणार आहे. प्रसन्न संधी नाकारल्यास पुढील उमदेवारांना संधी मिळणार आहे. प्रसन्नने ज्या ठिकाणी पोस्टींग मिळणार त्याठिकाणी जाणार असल्याचे सांगितले आहे.प्रसन्न हा श्रमसाफल्य बिल्डींग, डीएनसी रोड याठिकाणी राहतो. त्यांचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले. तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्यांचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्रमहाविद्यालयातून शिक्षण ही पूर्ण करीत आहे. स्वीय सहाय्यकांची परिक्षा त्याला चांगली गेली होती. त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील असे वाटले होते. पण भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळेल असा विचार कधी केला नव्हता. प्रसन्न येत्या ११ मार्चला एमपीएससीची परिक्षा देणार आहे. शॉर्टहॅण्ड या विभागासाठी तो परिक्षा देणार आहे. प्रसन्न लघुलेखनातच पुढे ही करियर करण्याची इच्छा आहे.मराठी तरुणाने देशात पहिला येणाचा मान मिळवून डोंबिवलीची मान उंचाविल्याबद्दल मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सागर जेधे व त्यांच्या पदाधिकाºयांनी प्रसन्नाच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिला. त्याचे विशेष अभिनंदन केले.फोटो आहे- आनंद मोरे----------------------------------------------------------

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली